Pune Rain: आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली नाही; राज ठाकरेंची प्रशासनावर टीका, पूरग्रस्त भागात पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 06:48 PM2024-07-28T18:48:02+5:302024-07-28T18:49:03+5:30

पाणी सोडण्याअगोदर नागरिकांना का कळवले नाही? राज ठाकरेंचा प्रशासनाला सवाल

Till date not a single meeting of all has been held Raj Thackeray criticism of the pune administration | Pune Rain: आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली नाही; राज ठाकरेंची प्रशासनावर टीका, पूरग्रस्त भागात पाहणी

Pune Rain: आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली नाही; राज ठाकरेंची प्रशासनावर टीका, पूरग्रस्त भागात पाहणी

पुणे :  भारतीय हवामानशास्त्र विभागाने शहरात पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे सोमवारीच धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला होता. त्यानंतरही महापालिका निद्रिस्त राहिली आणि सिंहगड रस्त्यावरील एकतानगर भागातील चार हजार जणांना आपले संसार पाण्यात सोडावे लागले. इशारा देऊनही कृती न झाल्यानेच ही आपत्ती ओढावली. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग दोघांमध्ये समन्वय नसल्याचे सिद्ध झाले. यात झालेल्या अताेनात नुकसानीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पुणेकरांनी केला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंहगड रोड भागात पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच योग्य ती कारवाई त्या अधिकाऱ्यावर होईल असे आश्वासन दिले. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनीसुद्धा प्रशासनाची चुक असल्याचे कबुल केले. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी राज यांनी प्रशासनावर टीका केली.  महानगरपालिका, प्रशासन, जलसंपदा विभाग आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. जगभरात पाणी सोडणार असल्यास ते अलार्म सिस्टिमद्वारे कळवतात. मग आपल्याकडे काही घोषणा अथवा सूचना देऊन का कळवले नाही असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.  सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी, निंबजनगरी राज ठाकरे भेट दिली. 

सिंहगड रोड भागात राज ठाकरे पाहणी करत असताना नागरिकांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला. त्यांनी आम्हाला पाणी सोडणार याची काही कल्पना दिली नव्हती. काही घोषणाही त्यांच्याकडून करण्यात आली नाही. पाणी आल्याचे कळाल्यावर आमची धावपळ सुरु झाली. पंधरा ते वीस मिनिटातच पाणी कंबरेवरून गळ्यापर्यंत आले. जवळपास ५० ते ५५ हजार क्यूसेकने त्यांनी पाणी सोडले होते. जर आम्हाला थोडं उशिरा कळलं असतं तर नक्कीच जीवितहानी झाली असती अशी आपभीती नागरिकांनी राज ठाकरे यांना सांगितली. त्यानंतर राज ठाकरे यांनी नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले आहे. 

Web Title: Till date not a single meeting of all has been held Raj Thackeray criticism of the pune administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.