अंत्यसंस्कार रस्त्यावरच करण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:17 AM2021-02-21T04:17:39+5:302021-02-21T04:17:39+5:30
महापालिकेच्या गलथान कारभाराचा फटका मृत पावलेल्या कुटुंबातला बसत असून गेल्या वर्षभरापासून कोरोना आल्यापासून हे काम पूर्णपणे बंद पडले आहे. ...
महापालिकेच्या गलथान कारभाराचा फटका मृत पावलेल्या कुटुंबातला बसत असून गेल्या वर्षभरापासून कोरोना आल्यापासून हे काम पूर्णपणे बंद पडले आहे. ते काम कधी सुरू होणार असा सवाल नागरिक करत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून खराडीगावातील या स्मशानभूमीचे विस्तारीकरण सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. केवळ वर्षभराच्या कामाला दोन वर्षे उलटून गेले तरी अद्याप काम अपूर्णच आहे. कोरोनापासून तर काम बंदच आहे.
----स्मशानभूमीच्या उर्वरित कामासाठी निधी कमी पडत असल्याने काम बंंद आहे. मात्र तात्पुरत्या स्वरूपाच रस्ता स्मशानभुमीकडे जाण्यासाठी करून स्मशानभूमी अत्यंसस्कारासाठी चालू करणार आहे.
-शिवाजी लंके,भवन विभाग प्रमुख मनपा
----
अतिशय लहान कामासाठी दोन वर्षे लागतात. गेल्या दोन वर्षांपासून मृतांच्या कुटुंबाची मृतदेह जाळण्यासाठी गैरसोय होत आहे. अधिकारी कोरोनाचे कारणपुढे करत वेळ मारून नेतात. मात्र खराडी-चंदननगरमधील नागरिकांनी मृतदेह जाळायचे कुठे ? मनपाच्या गलाथान कारभाराचा मी निषेध करतो,येत्या पंधरा दिवसांत काम पूर्ण न केल्यास मृतदेह महापालिकेत घेऊन जाऊन आंदोलन करणार.
- बापूसाहेब पठारे, माजी आमदार
---
फोटो ओळ:-खराडी स्मशानभूमीचे काम अपूर्ण असल्याने स्मशानभूमीला जाणा-या रस्त्यावरच अंत्यसंस्कार करताना मृताचे नातेवाईक.