वेळ नदीच्या बंधाऱ्यावरील कठडे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:10 AM2021-03-25T04:10:32+5:302021-03-25T04:10:32+5:30
-- तळेगाव ढमढेरे : भैरवनाथ नगर येथील वेळ नदीच्या बंधाऱ्यावरील संरक्षक कठडे गायब झाल्याने वाड्या-वस्त्यांवरील लोकांना ये-जा करण्यास हा ...
--
तळेगाव ढमढेरे : भैरवनाथ नगर येथील वेळ नदीच्या बंधाऱ्यावरील संरक्षक कठडे गायब झाल्याने वाड्या-वस्त्यांवरील लोकांना ये-जा करण्यास हा पूल धोकादायक झाला आहे.
शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे भीमा नदीवरील बंधाऱ्याच्या पुलाचे कठडे गायब झाल्याने मोठा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथ नगर बंधाऱ्यावरील वेळ नदीवरील पुलाचे कठडे गायब झाले त्यामुळे येथून प्रवास करताना नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भैरवनाथनगर स्मशानभूमी जवळ असलेल्या वेळ नदीवर असलेल्या छोट्या बंधाऱ्यावर स्वतंत्र पूल आहे, या पुलावरून पांढरी वस्ती, तांबुळ ओढा, धायरकर वस्ती या वस्तींवरील नागरिक पायी तसेच दुचाकीहून नेहमी ये-जा करत असतात. बंधाऱ्यावरील पुलाचे सर्व लोखंडी कठडे पावसाळ्यातील महापुरामुळे तुटून पाण्यात पडल्याने येथील बंधाऱ्याचे सर्वच कठडे पूर्णपणे गायब झालेले आहेत. पुलाच्या कॉंक्रिटमधील गज मोकळे झालेले असल्यामुळे या बंधाऱ्याच्या पुलावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांचा तोल गेल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून येथील बंधाऱ्यावरील पुलाच्या कठड्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे
--
कोट
तळेगाव ढमढेरे येथील वेळ नदीवरील बंधाऱ्याच्या पुलाच्या कठड्या बाबत तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांच्याशी संपर्क साधला असता सदर ठिकाणच्य बंधाऱ्याचे कठड्यांच्या दुरुस्तीचे काम एका ठेकेदाराला ठरवून दिलेले असून पुढील काळात ते काम मार्गी लागेल.
- संजय खेडकर,ग्रामविकास अधिकारी,ग्रामपंचायत,तळेगाव ढमढेरे.
--
फोटो क्रमांक: २४तळेगाव ढमढेरे वेळ नदी बंधारा
फोटो ओळ – तळेगाव ढमढेरे येथील वेळ नदीवरील बंधाऱ्याचे गायब झालेले कठडे व धोकादायक प्रवास करताना दुचाकीस्वार.