गटई कामगारांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:10 AM2021-05-26T04:10:04+5:302021-05-26T04:10:04+5:30
कोविडचा संपूर्ण देशभर विषाणूचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळेच शासनाने नागरिकांसाठी नियम घालून दिले आहेत, अशा अनेक कारणांमुळे नोकरी धंदे ...
कोविडचा संपूर्ण देशभर विषाणूचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळेच शासनाने नागरिकांसाठी नियम घालून दिले आहेत, अशा अनेक कारणांमुळे नोकरी धंदे बंद झाले आहेत. त्यामुळे हाताला काम नाही व दामही नाही अशी अवस्था भोर शहरातील चौपाटी, वाकडागेट, मंगळवार पेठ, एसटी स्टॅन्ड, इत्यादी ठिकाणी गटई कारागीर आहेत. सध्या त्यांच्यावर हलाखीची परिस्थिती ओढवली आहे. त्यांची उपासमार चालू असल्याने ध्रुव प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी एक महिना पुरेल असे अन्नधान्य किट इतर खाद्यपदार्थांचे उत्रोली येथील योगीराज मंगल कार्यालय जवळ वाटप केले आहे. यावेळी उत्रोली गावचे उपसरपंच संतोष शिवतरे, विशाल भगत, विजय भगत, ज्ञानेश्वर कानडे, नागेश कानडे, बबन कानडे, महादेव कांबळे, महादेव कानडे, पूनाजी दळवी, राहुल खोपडे, कृष्णा सणस इत्यादी उपस्थित होते.
गटई कारागिरांना किटचे वाटप करताना.