चर्मकार समाजातील गटई कामगारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:10 AM2021-04-22T04:10:22+5:302021-04-22T04:10:22+5:30

कातडी वस्तू तयार करणारे कारागीर चपला, पादत्राणे, पर्स,बटवे, कातडी पट्टे आदी बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे. अशी कामे चर्मकार ...

The time of famine on the group workers in the Charmakar community | चर्मकार समाजातील गटई कामगारांवर उपासमारीची वेळ

चर्मकार समाजातील गटई कामगारांवर उपासमारीची वेळ

Next

कातडी वस्तू तयार करणारे कारागीर चपला, पादत्राणे, पर्स,बटवे, कातडी पट्टे आदी बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे. अशी कामे चर्मकार करीत असतात

भोर तालुक्यातील चर्मकार समाजातील गटई कारागीर चप्पल, बूट शिवून व बूट पॉलीश करून आपले कुटुंब चालवतात दिवसभरात किमान २०० ते ३०० रुपये कमवून आपला घरप्रपंच कसाबसा भागवतात त्यामध्ये त्यांच्या मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च, दवाखाना, परंतु आजच्या या कोरोनाच्या काळात त्यांच्या या धंद्यावरही परिणाम झाला आहे. तालुक्यातून चप्पल शिवण्यासाठी येणारी व्यक्ती कशी आहे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, हे काहीच माहीत नसताना आपला जीव मुठीत घेऊन लोक आपल्या उपजीविकेसाठी गटई काम करत असतात. शासनाने १४ एप्रिल रात्री ८ ते ३० एप्रिल असा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लावल्याने गटई कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

--कोट

रस्त्यावर बसून चप्पल, बूट शिवणकाम करणारे तसेच दुकानावर चप्पल बूट शिवणारे चर्मकार दररोजचा उदरनिर्वाह रोजच्या कमाईवर करत असतात. लॉकडाऊनमुळे रस्त्याच्या कडेला दुकाने थाटता येत नसल्यामुळे,आमच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. रोजंदारीचे दुसरे साधन नसल्याने अशा चर्मकार व्यवसाय करणाऱ्या नागरिकांकडे शासनाने लक्ष देऊन त्यांना आर्थिक मदत करावी.

-

संदीप काळे,

अध्यक्ष भोर तालुका चर्मकार संघ

Web Title: The time of famine on the group workers in the Charmakar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.