नववर्षाच्या स्वागतावेळी काळाचा घाला! बंदोबस्तावरील पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:01 IST2025-01-01T13:00:09+5:302025-01-01T13:01:01+5:30

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार हे चाकण एमआयडीसीमध्ये पेट्रोलिंग करत होते

Time flies while welcoming the New Year! Accidental death of a police sub-inspector on duty | नववर्षाच्या स्वागतावेळी काळाचा घाला! बंदोबस्तावरील पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू

नववर्षाच्या स्वागतावेळी काळाचा घाला! बंदोबस्तावरील पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू

चाकण : एकीकडे नववर्षाचा उत्साह, जल्लोष सगळीकडे दिसून येत असतानाच दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचा कर्तव्यावरती असताना अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र गिरनार असं त्यांचं नाव असून ते कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

 नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार हे चाकण एमआयडीसीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी महिंद्रा कंपनीच्या समोरुन ते कारमधून निघाले असताना समोर एक कंटेनर उजव्या लेन मधून चालला होता, मात्र, कंटेनर चालक अचानकपणे डाव्या लेनमध्ये घुसला आणि पीएसआय गिरनार यांच्या गाडीची कंटेनरला जोराची धडक बसली. या घटनेमध्ये गिरनार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने जितेंद्र गिरनार यांच्या कुटुंबावर नवीन वर्षात दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Time flies while welcoming the New Year! Accidental death of a police sub-inspector on duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.