...तोपर्यंत पाइपलाइनचे काम सुरू होऊ देणार नाही : कडू
By admin | Published: May 13, 2017 04:14 AM2017-05-13T04:14:37+5:302017-05-13T05:07:37+5:30
एचपी गॅस पाइपलाइन बाधित जागेला चालू बाजारभावाच्या पाचपट मोबदला शेतकऱ्यांना जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत या गॅस पाइपलाइनचे काम सुरू होऊ देणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : एचपी गॅस पाइपलाइन बाधित जागेला चालू बाजारभावाच्या पाचपट मोबदला शेतकऱ्यांना जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत या गॅस पाइपलाइनचे काम सुरू होऊ देणार नाही. असा खणखणीत इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. दौंडकरवाडी (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गांडेकर, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड राज्य अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे, जालना जिल्हाध्यक्ष गजानन पाटील, जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, सरपंच सुभाष वाडेकर, अध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, वस्ताद दौंडकर, दत्ताजी देसाई, सर्जेराव दौंडकर, शिवाजी म्हाबरे, दत्तात्रय दौंडकर, पोपट दौंडकर, सुभाष पावले, सचिन घुंडरे, मंगेश दौंडकर, चंद्रशेखर दौंडकर, बाळासाहेब दौंडकर आदींसह अन्य मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, सध्या शेती करणे परवडत नाही. कोणत्याही शेतमालाला हमीभाव नसल्याने उत्पन्नाची शाश्वती राहिली नाही; मात्र शेतीचे वीजबिल वाढले. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.