वेळ नदीवरील पुलाचे काम तत्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:11 AM2021-04-08T04:11:06+5:302021-04-08T04:11:06+5:30
खेड येथून जाणारा रस्ता वाफगाव, चिंचबाईवाडी, टाकळकरवाडी, वरुडे, गाडकवाडी, पुढे शिरूर व आंबेगाव तालुक्यात हा रस्ता जातो. या रस्त्यादरम्यान ...
खेड येथून जाणारा रस्ता वाफगाव, चिंचबाईवाडी, टाकळकरवाडी, वरुडे, गाडकवाडी, पुढे शिरूर व आंबेगाव तालुक्यात हा रस्ता जातो. या रस्त्यादरम्यान वेळ नदीवर वाफगाव येथे कमी उंचीचा पूल आहे. पावसळ्यात वेळ नदीला पूर आल्यानंतर पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी जाते. त्यामुळे या गावाचा संपर्क तुटतो. वाहतूक ठप्प होते. त्यामुळे नोकरवर्गाला, विद्यार्थ्याना वेळेवर जाता येत नाही. शेतकऱ्यांनाही शेतातील मालवाहतूक करता येत नाही. तसेच, या पुलाला संरक्षक कठडे नसल्यामुळे पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे अनेक दुर्घटना गेल्या काही वर्षात घडल्या आहे. वेळ नदीवर पूल व्हावा, अशी ग्रामस्थांची कित्येक वर्षांपासून मागणी होती. या पुलाच्या नवीन बांधकामासाठी नाबार्डकडून दीड कोटी रुपायांचा निधी मिळाला आहे. मात्र, उद्यापर्यंतही पुलाचे काम सुरू झाले नाही. पुढे पावसळा आल्यानंतर पुलाचे काम करता येणार नाही. तसेच, ग्रामस्थांना पुन्हा गैरसोयीचा सामना करावा लागणार सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन तत्काळ पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
०७ दावडी
बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देताना वाफगाव ग्रामस्थ.