महाराष्ट्रातील कलावंतांवर उपासमारीची वेळ; आता तरी गावगाड्याच्या तमाशाला परवानगी द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 06:01 PM2021-11-16T18:01:15+5:302021-11-16T18:09:08+5:30
सर्व नियम स्थिती व आटील व निर्बंध मागे घेण्यात आले असून सर्व स्थरावरील कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे
खोर : कोरोनाच्या महामारीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात कलावंतांवर उपास मारीची वेळ आली आहे. मात्र आता कोरोनाचे संकट दूर झाले असून आता तरी आम्हा कलावंतांना गाव गाड्यातील तमाशा सुरू करण्याची परवानगी मिळावी असे महाराष्ट्र राज्याचे तमाशा मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी म्हटले आहे.
सर्व नियम अटी व निर्बंध मागे घेण्यात आले असून सर्व स्थरावरील कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. मग आम्हा कलावंतांना का असे उपाशी मारायचे काम या सरकारने चालवल्याचा आरोप खेडकर यांनी केला आहे.
''महाराष्ट्र राज्यात सांस्कृतिक विभागाला परवानगी देण्यात आली आहे मात्र गाव गाड्यातील तमाशा मंडळ यांना परवानगी का नाकारता? आज कीर्तन, नेत्यांची सभा मोठ्या दिमाखात पार पडत आहे. या सभांना मोठी गर्दी जमत असते. मग तेथेच का कोरोनाचा विसर पडत आहे. ज्याचे हातावर पोट आहे, अपार कष्ट करून जे आपले पोट भरत आहेत अशा कलावंतांना का आपण मागे ठेवत आहे. आज दोन वर्षे उलटली गेली आहे. तब्बल दोन वर्षे या लोक कलावंतांना या कोरोनाच्या कालावधीत चक्क उपास मारीची वेळ येऊन ठेपली आहे. आता तरी आमच्या लोक कलावंतांच्या बाबतीत सहकार्य करून थोडी दया दाखवून आमचा फड सुरू करण्याची परवानगी मिळावी अशी राज्य सरकारला आमची हात जोडून विनंती त्यांनी यावेळी केली आहे.''