हॉस्पिटलच्या नावावर काळ फासलं; अधिकाऱ्यावर चिल्लर पैसे फेकले, दीनानाथच्या बाहेर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:30 IST2025-04-04T12:30:16+5:302025-04-04T12:30:26+5:30
हॉस्पिटलची जागा त्यांच्या ताब्यातून काढून घ्यावी. अधिकाऱ्यांना निलंबित करावे, रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई कारवाई, आंदोलकांची मागणी

हॉस्पिटलच्या नावावर काळ फासलं; अधिकाऱ्यावर चिल्लर पैसे फेकले, दीनानाथच्या बाहेर आंदोलन
पुणे: शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांवर मातृछत्र गमावण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाच्या पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शिवसेनेकडून रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केले जात आहे.
रुग्णालयाने १० लाख मागितले होते का? याबाबत विचारले असता अधिकाऱ्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. योग्य माहिती आपल्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल असे त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. रुग्णालयाच्या बाहेर विविध संघटना, पक्ष एकत्र येऊन आंदोलन करू लागले आहेत. हॉस्पिटलची जागा त्यांच्या ताब्यातून काढून घ्यावी. अधिकाऱ्यांना निलंबित करावे, रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई कारवाई अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. पतित पावन संघटनकडून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नावावर काळ फासलं गेलं आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यावर लोकांनी चिल्लर पैसे फेकले.
यावेळी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. आम्ही योग्य माहिती शासनाला दिली आहे. जी काही माहिती आपल्या समोर आली आहे. ती अर्धवट आणि दिशाभूल करणारी आहे. रुग्णालय योग्य ती भूमिका लवकर जाहीर करेल असे त्यांनी सांगितले आहे.