धावत्या कंटेनरचा टायर फुटून उडाला जोरदार भडका; कंटेनरमधील ऑटो स्पेयर पार्ट्स जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 09:52 AM2023-12-19T09:52:45+5:302023-12-19T09:55:37+5:30

हा अपघात नाशिक-पुणे महामार्गवरील आळेफाटा बायपासवर सोमवारी रात्री दहावाजेच्या सुमारास घडला....

Tire burst of running container causing huge conflagration; Burn auto spare parts in container | धावत्या कंटेनरचा टायर फुटून उडाला जोरदार भडका; कंटेनरमधील ऑटो स्पेयर पार्ट्स जळून खाक

धावत्या कंटेनरचा टायर फुटून उडाला जोरदार भडका; कंटेनरमधील ऑटो स्पेयर पार्ट्स जळून खाक

आळेफाटा (पुणे) : ऑटो स्पेयर पार्ट्स घेऊन नाशिककडे जात असलेल्या भरधाव कंटेनरचा  अचानक टायर फुटला. अनियंत्रित झालेला कंटेनर  रस्त्याच्या बाजूला लावत असतानाच अचानक आगीचा भडका उडाल्याने चालक-वाहकांनी उड्या मारून आपले प्राण वाचविले. परंतु कंटेनरमधील लाखोरुपयांचे ऑटो स्पेयर पार्ट्सची राख झाली. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गवरील आळेफाटा बायपासवर सोमवारी रात्री दहावाजेच्या सुमारास घडला.

चाकण एमआयडीसी मधील ऑटो स्पेयर पार्ट्स कंपनीतून पार्ट भरून (एन.एल.1 ए.एच. 1443) क्रमाकांचा कंटेनर पुणे-नाशिक महामार्गाने नाशिककडे जात होता. दरम्यान आळेफाटा बायपासला अचानक या धावत्या कंटेनरचा टायर फुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेल्या कंटेनर चालकाने नियंत्रण मिळवून महामार्गाच्या बाजूला कंटेनर लावण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात अचानक कंटेनरने पेट घेतल्यामुळे चालक व वाहक यांनी बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे दोघेही सुखरूप बचावले मात्र मागील बाजूच्या टायरने अगीचा भडका घेतला. वडगाव आनंद उपसरपंच ऋषिकेश गडगे, स्वप्नील देवकर, दीपक शिंदे, साहिल गडगे, शुभम गडगे यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान आग आटोक्यात येत नसल्याने जुन्नर या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाडीस पाचरण करण्यात आले. मात्र अग्निशमन वाहन नेहमीप्रमाणे जुन्नर येथून आळेफाटा येथे पोहोचन्यासाठी तीन तासाचा वेळलागल्याने कंटेनरमधील लाखो रुपयांचे ऑटो स्पेयर पार्ट्स जळाली.आळेफाटा पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Tire burst of running container causing huge conflagration; Burn auto spare parts in container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.