थेट लढतींत होणार उमेदवारांची दमछाक

By admin | Published: February 17, 2017 04:23 AM2017-02-17T04:23:36+5:302017-02-17T04:23:36+5:30

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीला आता पाच दिवस बाकी राहिले असताना सर्वच पक्षांमधील उमेदवारांची

Tired candidates in direct battles | थेट लढतींत होणार उमेदवारांची दमछाक

थेट लढतींत होणार उमेदवारांची दमछाक

Next

राजगुरुनगर : जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीला आता पाच दिवस बाकी राहिले असताना सर्वच पक्षांमधील उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्याची धावपळ सुरु आहे. त्यामध्ये ज्या गट व गणांमध्ये सरळ लढती आहेत तेथील उमेदवारांना विजयासाठी अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. विजयासाठी होणाऱ्या मतदानापैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवावी लागणार असल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे.
खेड तालुक्यामध्ये एका गटामध्ये तर तीन गणांमध्ये सरळ लढती आहेत. त्यामध्ये रेटवडी-पिंपळगावतर्फे खेड या गटामध्ये तर पिंपळगावतर्फे खेड, काळूस आणि नाणेकरवाडी या गणांमध्ये सरळ लढती आहेत. प्रत्येक गटाची मतदारसंख्या ४० हजार ते २१ हजाराच्या दरम्यान आहे. सर्वात कमी नाणेकरवाडी-महाळुंगे गटामध्ये २१४५४ मतदार आहेत. येथे चौरंगी लढत असून विजयी उमेदवारासाठी झालेल्या मतदानामध्ये तीस-ते चाळीस टक्के मतेही विजयासाठी पुरेशी आहेत. मात्र दुरंगी लढत असलेल्या रेटवडी-पिंपळगाव तर्फे खेड या गटामध्ये सर्वात जास्त ४१,१८२ मतदार आहेत. येथे सरासरी सत्तर टक्के मतदान (२९ ते ३० हजार) जरी झाले तरी विजयासाठी उमेदवाराला कमीतकमी १५ ते १६ हजार मते मिळवावी लागणार आहेत. तेच नाणेकरवाडी-महाळुंगे गटामध्ये ८० टक्के (१६ ते १७ हजार) मतदान झाले तरी तेथे चौरंगी लढतीमुळे विजयासाठी आठ हजार मतेही पुरेशी ठरु शकतात. त्या खालोखाल सांडभोरवाडी-काळूस गणामध्ये ३९,८१८ मतदार आहेत. येथेही तिरंगी लढत असली तरी दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये कडवी लढत आहे. त्यामुळे येथेही विजयी उमेदवाराला झालेल्या मतदानाच्या ४५-५० टक्के मतदान घ्यावे लागणार आहे.

Web Title: Tired candidates in direct battles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.