दीड वर्षांपासून होणाऱ्या सासरच्या छळाला कंटाळली; बारामतीत नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 09:08 AM2024-05-29T09:08:25+5:302024-05-29T09:09:01+5:30

लग्नामध्ये आम्हाला मान पान केला नाही, तसेच माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, दोन तोळे सोने घेऊन ये असे म्हणत केला छळ

Tired of being harassed by the father in law for half a year An extreme step taken by newlyweds in Baramati | दीड वर्षांपासून होणाऱ्या सासरच्या छळाला कंटाळली; बारामतीत नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

दीड वर्षांपासून होणाऱ्या सासरच्या छळाला कंटाळली; बारामतीत नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

सांगवी(बारामती) : विवाहानंतर माहेरून पैसे व दागिने आणण्यासाठी तगादा लाऊन त्याची पूर्तता न झाल्याने सासरच्या छळाला कंटाळून अखेर नवविवाहितेने टोकाचे पाऊल उचलत सासरच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीतून समोर आला आहॆ. नंदिनी शुभम पवार (वय २१) असे सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहॆ. विवाहानंतर अवघ्या दिड वर्षात नवविवाहितेला छळ करून आत्महत्या करण्यास भाग पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहॆ.

मयत नंदनीचा भाऊ विक्रांत राजेश तागडकर (वय २५)  व्यवसाय शिक्षण रा. बडारवाडी पोस्ट भिंगार ता.जि. अहिल्यानगर (अहमदनगर ) यांनी मयत नंदिनीचे पती,सासू- सासरे व दिरा विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहॆ. मंगळवारी (दि.२८) रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहॆ. आरोपी पती शुभम अशोक पवार,सासू लिलाबाई अशोक पवार,सासरे अशोक श्रीपती पवार,दीर अक्षय अशोक पवार सर्व (रा. बारामती ता. बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

विवाहा नंतर दि. ३/१२/२०२२ रोजी ते दि. २८/०५/२०२४ रोजी पर्यंत नंदनीकडे माहेरून दागदागिने व पैशांच्या मागणीचा हा छळ सुरू होता. भिगवण रोड बारामती ता. बारामती जि. पुणे, येथे हा संपूर्ण प्रकार घडला आहॆ. दि. २८/११/२०२२ रोजी नंदिनी व शुभम यांचा विवाह झाला होता. विवाहाच्या पाच ते सहा दिवसांनी नंदिनी सासरी नांदत आसताना तिला  तिचे सासरे अशोक श्रीपती पवार, पती शुभम अशोक पवार,सासू लिलाबाई अशोक पवार, दिर अक्षय अशोक पवार यानी वारंवार शिवीगाळ, दमदाटी करुन लग्नामध्ये आम्हाला मान पान केला नाही, तसेच माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, दोन तोळे सोने घेऊन ये असे म्हणून तिला मारहाण करून तिचा वारंवार मानसिक व शारीरीक छळ करून तिला गळफास घेवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Tired of being harassed by the father in law for half a year An extreme step taken by newlyweds in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.