मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 03:44 PM2022-12-25T15:44:45+5:302022-12-25T15:44:53+5:30
मुख्याध्यापकांनी शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करत नाही, रस्टीकेट करतो, शाळेत पाठवू नका असा मुलाला शारीरिक व मानसिक त्रास दिला
पिंपरी : मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. भोसरी येथील गव्हाणे वस्ती परिसरात १० ते १३ डिसेंबर दरम्यान हा प्रकार घडला. पंधरा वर्षीय मुलाच्या ३७ वर्षीय आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हितेश शर्मा (वय ४०, रा. गव्हाणे वस्ती भोसरी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश शर्मा हे मुख्याध्यापक आहेत. फिर्यादी यांच्या मुलाला शर्मा हे शाळेत मारहाण करत होते, शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करत नाही, रस्टीकेट करतो, शाळेत पाठवू नका असा फिर्यादींच्या मुलाला शारीरिक व मानसिक त्रास दिला. याच दबावातून मुलाने राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यानंतर याप्रकरणी तपास करून हितेश शर्मा याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, असे फिर्यादीत नमूद आहे.