पाणी हापसून आता थकलो!
By admin | Published: May 8, 2017 02:21 AM2017-05-08T02:21:50+5:302017-05-08T02:21:50+5:30
हातपंपाचे पाणी हापसून हापसून आता थकलो... दिवसभरात कसेबसे चार हंडे पदरात पडतात... अशा भावना व्यक्त केल्या. भोर तालुक्यातील
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : हातपंपाचे पाणी हापसून हापसून आता थकलो... दिवसभरात कसेबसे चार हंडे पदरात पडतात... अशा भावना व्यक्त केल्या. भोर तालुक्यातील शिरोली गावातील महिलांनी. शिरवली हिर्डोस मावळ गावात कोणत्याच प्रकारची पाणीपुरवठा योजना नसून कुठेच पाणी उपलब्ध नाही. एका हातपंपावर नंबर लावून पाणी भरले जाते. खर्चाच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र अद्याप टँकर सुरू झालाच नाही. पाणी हापसून महिलांना खांदेदुखी व अंगदुखीचे आजार उद्भवत आहेत.
भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरादेवघर धरण भागात दरवर्षी साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो आणि पाणी डोंगरावरून वाहून जाते. धरण भरते आणि पुन्हा रिकामे होते. धरणाच्या काठावरील शिरवली गावात १५ वर्र्षांपासून उन्हाळ््यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. गावात कोणत्याच प्रकारची पाणीपुरवठ्याची योजना राबवली गेली नाही. एक हातपंप आहे, मात्र मार्च महिन्यानंतर त्याला पाणी कमी पडत असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते. हे वर्षानुवर्षे सुरू आहे. राष्ट्रवादी काँॅग्रेसच्या वतीने रणजित शिवतरे यांनी पाणी साठवण्यास टाक्या आणि खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला तो
टँकर अधूनमधून येत असल्याने पाण्याचा थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळत आहे.
पाण्यावाचून महिलांचे होताहेत हाल
गावाजवळचे ढवरे आटले असून जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने तीन किलोमीटरवर असलेल्या नीरादेवघर धरणावरून डोक्यावरून किंवा पिक-अप जीपने विकत पाणी आणावे लागत असल्याने तेथील महिलांचे पाण्यावाचून प्रचंड हाल सुरू आहेत.
रिंगरोडला लागून असलेल्या हातपंपाला थोड्याफार प्रमाणात पाणी येत असल्याने दिवसभर रांगा लावून तासाला चार हंडे याप्रमाणे हापसून पाणी भरावे लागत आहे.
दरवर्षी उन्हाळ््यात हेच काम करावे लागत असल्याने जीव कासावीस होत असल्याचे येथील महिला सांगतात.
यावर कायमस्वरुपी उपाययोजना करून पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.