अनधिकृत फ्लेक्सबाजीला आला ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:14 AM2021-02-17T04:14:33+5:302021-02-17T04:14:33+5:30

एका बाजूला अनधिकृत जाहिरातींना बंदी असतानाच, चौकाचौकात लाकडांचे पहाड बांधून धोकादायकरीत्या जाहिरात फ्लेक्‍स उभारले जात आहेत. काही ठिकाणी तर ...

Tissue got unauthorized flexing | अनधिकृत फ्लेक्सबाजीला आला ऊत

अनधिकृत फ्लेक्सबाजीला आला ऊत

Next

एका बाजूला अनधिकृत जाहिरातींना बंदी असतानाच, चौकाचौकात लाकडांचे पहाड बांधून धोकादायकरीत्या जाहिरात फ्लेक्‍स उभारले जात आहेत. काही ठिकाणी तर पदपथावरच हे फ्लेक्‍स बांधले जात आहेत. त्यामुळे हे पहाड भर रस्त्यात कोसळण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. मात्र, त्याकडेही प्रशासनाकडून सोयीस्करपणे केले जात आहे.

चौकट:

कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार...

गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांचे वाढदिवस आणि अन्य कार्यक्रमांच्या जाहिरातींचे शेकडो फलक सिंहगड रस्ता परिसरात लावण्यात आले आहेत. बऱ्याच ठिकाणी फ्लेक्स लावून परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. प्रत्येक मुख्य चौकात राजकीय जाहिरातबाजी वाढत आहे. सन समारंभ, राजकीय लोकांचे वाढदिवस त्यानिमित्त पोस्टरबाजी पाहायला मिळते. पुण्यासारख्या स्मार्ट शहरात बेकायदा फ्लेक्स, बॅनरचा सुरू असलेल्या सुळसुळाटाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचे कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे.

कोट:

रस्त्यालगत लाकडी पहाड बांधून फ्लेक्स लावले आहेत. यामुळे अपघाताचा धोका संभवतो आहे.

उमेश खरात, चिटणीस, भाजप झोपडपट्टी आघाडी, पुणे शहर

उपलब्ध मनुष्यबळानुसार आम्ही सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत लावण्यात आलेल्या अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करीत असतो. यापुढेही अनधिकृतपणे असणाऱ्या फ्लेक्सवर तसेच फ्लेक्स लावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

जयश्री काटकर, सहायक आयुक्त,

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय

फोटो ओळ:

. वडगाव बुद्रुक येथे लावण्यात आलेले विविध फ्लेक्स.

Web Title: Tissue got unauthorized flexing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.