शिवरायांचा इतिहास जाणून घेण्यासाठी तरुणांनी गड-किल्ल्यांचा अभ्यास करावा - राहुल कुल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 02:12 PM2022-11-10T14:12:16+5:302022-11-10T14:12:26+5:30

गड-किल्ल्यांतून शिवाजी महाराजांनी एक इतिहास निर्माण केलेला आहे

To know the history of shivaji maharaj the youth should study the forts Rahul Kul | शिवरायांचा इतिहास जाणून घेण्यासाठी तरुणांनी गड-किल्ल्यांचा अभ्यास करावा - राहुल कुल

शिवरायांचा इतिहास जाणून घेण्यासाठी तरुणांनी गड-किल्ल्यांचा अभ्यास करावा - राहुल कुल

googlenewsNext

दौंड : शिवरायांचे शौर्य गड-किल्ल्यांच्या इतिहासातून स्पष्ट होते. भावी पिढीला शिवरायांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तरुणांनी गड-किल्ल्यांचा अभ्यास केला पाहिजे, असे मत भाजपचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. दौंड येथील मुंजाबा सेवा प्रतिष्ठान आणि रोहित राजेश पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या गड-किल्ले स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी राहुल कुल बोलत होते.

शिवाजी महाराजांनी गड-किल्ले बांधले आणि जिंकलेदेखील. या गड-किल्ल्यांतून शिवाजी महाराजांनी एक इतिहास निर्माण केलेला आहे. तेव्हा त्यांच्या इतिहासाची परंपरा कार्यरत ठेवायची असेल तर किल्ले स्पर्धांचे आयोजन काळाची गरज असल्याचे शेवटी राहुल कुल म्हणाले. माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया म्हणाले, मुंजाबा सेवा प्रतिष्ठानने कायमच सामाजिक बांधिलकी जोपासून वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. तरुण पिढीपर्यंत चांगले आदर्श निर्माण होण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. किल्ले स्पर्धांचे आयोजक रोहित पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचा इतिहास नवीन पिढीला अवगत करायचा असेल तर दगड-मातीचे किल्ले बनविणे हा पर्याय असून, यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. 

 

Web Title: To know the history of shivaji maharaj the youth should study the forts Rahul Kul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.