आज शहरातील ६० केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:14+5:302021-09-16T04:16:14+5:30

पुणे : पुणे महापालिकेला शासनाकडून नव्याने लस न आल्याने, आरोग्य विभागाकडे शिल्लक असलेली कोविशिल्ड लस आज (गुरुवार, दि. १६) ...

Today, 100 Covishield vaccines are available at 60 centers in the city | आज शहरातील ६० केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

आज शहरातील ६० केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

Next

पुणे : पुणे महापालिकेला शासनाकडून नव्याने लस न आल्याने, आरोग्य विभागाकडे शिल्लक असलेली कोविशिल्ड लस आज (गुरुवार, दि. १६) शहरातील ६० लसीकरण केंद्रांवर वितरित करण्यात आली आहे. या प्रत्येक ठिकाणी लसीचे १०० डोस दिले जाणार आहेत. दरम्यान, आज कुठेही कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे.

लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर १५ टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे, तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (२४ जून पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर ३५ टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

--------------------

Web Title: Today, 100 Covishield vaccines are available at 60 centers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.