आज शहरातील १८५ केंद्रांवर प्रत्येकी १६० कोविशिल्ड लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:45+5:302021-09-08T04:16:45+5:30
पुणे : पुणे महापालिकेच्या १८५ लसीकरण केंद्रांवर आज (बुधवार, दि. ८) प्रत्येकी १६० लसीचे डोस वितरित करण्यात आले ...
पुणे : पुणे महापालिकेच्या १८५ लसीकरण केंद्रांवर आज (बुधवार, दि. ८) प्रत्येकी १६० लसीचे डोस वितरित करण्यात आले आहेत़ तर, ससूनसह महापालिकेच्या झोननिहाय ११ दवाखान्यांत प्रत्येकी १४० कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे.
लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर १५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर कोविशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (१५ जूनपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर ३५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे.
लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.