आज शहरातील १८६ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोविशिल्ड लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:11 AM2021-09-11T04:11:59+5:302021-09-11T04:11:59+5:30

पुणे : पुणे महापालिकेला शासनाकडून ३० हजार कोविशिल्ड लस प्राप्त झाल्यामुळे, आज (शनिवार दि. ११ ) १८६ लसीकरण केंद्रांवर ...

Today, 200 Covishield vaccines are available at 186 centers in the city | आज शहरातील १८६ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोविशिल्ड लस उपलब्ध

आज शहरातील १८६ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोविशिल्ड लस उपलब्ध

Next

पुणे : पुणे महापालिकेला शासनाकडून ३० हजार कोविशिल्ड लस प्राप्त झाल्यामुळे, आज (शनिवार दि. ११ ) १८६ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी २०० लसीचे डोस महापालिकेकडून वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान, आज शहरातील कुठल्याही महापालिकेच्या केंद्रावर व दवखान्यात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार नाही.

आज लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर, १५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर कोविशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (१८ जून पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगद्वारे तर ३५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. यानंतरही लस शिल्लक राहिल्यास ऑन स्पॉट नोंदणी करून उपस्थित नागरिकांना लस देण्यात यावी, अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आल्या असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली़

लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

--------------------

Web Title: Today, 200 Covishield vaccines are available at 186 centers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.