आज शहरातील १८६ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:12 AM2021-09-18T04:12:32+5:302021-09-18T04:12:32+5:30
पुणे : पुणे महापालिकेच्या १८६ केंद्रांवर आज, शनिवारी प्रत्येकी २०० लसीचे डोस वितरित करण्यात आले आहेत, तर ससूनसह ...
पुणे : पुणे महापालिकेच्या १८६ केंद्रांवर आज, शनिवारी प्रत्येकी २०० लसीचे डोस वितरित करण्यात आले आहेत, तर ससूनसह महापालिकेच्या ११ दवाखान्यांत ५०० कोव्हॅक्सिन लसी उपलब्ध केल्या आहेत.
लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगद्वारे, तर १५ टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे, तर कोव्हिशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (२६ जून पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगद्वारे, तर ३५ टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. यानंतरही लस शिल्लक राहिल्यास ऑन स्पॉट नोंदणी करून दिव्यांग नागरिक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना देण्यात याव्यात अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास दिल्या असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली़
लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंग करिता सकाळी आठ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.