जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आज फेरफार अदालत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:11 AM2021-02-10T04:11:44+5:302021-02-10T04:11:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी घेऊन जनतेच्या प्रलंबित ...

Today in all the talukas of the district | जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आज फेरफार अदालत

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आज फेरफार अदालत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी घेऊन जनतेच्या प्रलंबित साध्या/वारस/तक्रारी नोंदी निर्गत करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील फेरफार अदालत बुधवारी (दि. १०) आयोजित केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

कुळकायदा शाखेचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यात झालेल्या अदालतीमध्ये ४ हजार २४३ नोंदी निर्गत केल्या आहेत. जिल्ह्यात सध्या २६ हजार ७७० नोंदी प्रलंबित आहे. त्यापैकी १७ हजार ९३६ नोंदी नोटीस काढणे व बजावण्यावर प्रलंबित आहेत. ९ हजार ६१९ नोंदी प्रमाणीकरणासाठी उपलब्ध आहे. यापैकी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्यादृष्टीने फेरफार अदालतीमध्ये प्रयत्न केले जाणार आहेत.

फेरफार अदालतीसाठी संबंधित महसूल मंडलातील तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी/तहसीलदार काही फेरफार अदालतीला उपस्थित राहणार आहेत. फेरफार अदालतीसाठी संबंधित व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र सादर करुन आपल्या नोंदी निर्गत कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.

Web Title: Today in all the talukas of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.