बारामतीत आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:52+5:302021-07-22T04:07:52+5:30
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका महिला राष्ट्रवादी व शहर युवतीच्या वतीने तोंडाच्या कर्करोग तपासणी ...
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका महिला राष्ट्रवादी व शहर युवतीच्या वतीने तोंडाच्या कर्करोग तपासणी व स्क्रीनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी (दि.२२) रोजी सकाळी साडेनऊ वाजता एमआयडीसीतील महिला ग्रामीण रुग्णालयात या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. २२ ते २४ जुलै तीन दिवस सकाळी नऊ ते साडेबारापर्यंत तपासणी व स्क्रीनिंग केले जाणार असल्याची माहिती शिबिराच्या संयोजक तालुकाध्यक्षा वनिता बनकर व युवतीच्या शहराध्यक्ष आरती शेंडगे-गव्हाळे यांनी दिली.
या शिबिरात डॉ. मनोज लोखंडे, डॉ. धनश्री जाधव, डॉ. अभिषेक घुले व डॉ. निकिता घुले तपासणी करणार आहेत. तोंडाची त्वचा लाल होणे, बरी न होणारी जखम, तोंडातील गाठ, पांढरा चट्टा अशी लक्षणे असणा-या स्त्री व पुरुष रुग्णांनी तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर अशी शिबिरे होणार आहेत. बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे व महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई हे या शिबिरासाठी सहकार्य करणार आहेत.