भाजपाचे गिरीश बापट आज पुण्यातून भरणार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 11:58 AM2019-04-02T11:58:27+5:302019-04-02T11:59:51+5:30
शहराचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेऊन भारतीय जनता पक्षाच्या पदयात्रेला सुरूवात झाली.
पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीत पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले गिरीश बापट काही वेळात अर्ज भरणार आहेत.
या करिता शहराचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरूवात झाली. कसबा गणपती, फडके हौद चौक, नरपतगिरी चौक तेथून जिल्हाधिकारी कचेरीजवळ पोहोचली असून इथे सभेला सुरुवात झाली आहे.
बापट यांच्या शक्तिप्रदर्शन रॅलीमध्ये महसूलमंत्री चंद्रकात पाटील, रासपचे प्रमुख आणि दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर,भोसरीचे महेश लांडगे, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह पुण्याचे सर्व आमदार, महापौर मुक्ता टिळक आणि सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बापट यांच्यासह बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवणाºया भाजपच्या उमेदवार कांचन कुल देखील आज अर्ज भरणार असल्याचे समजते. दरम्यान, अर्ज भरण्याची मुदत 4 एप्रिलपर्यंत असून, उद्या (दि.3)आघाडीतर्फे अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.