भाजपचा आज शेतकाऱ्यांसोबत सुशासन दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:11 AM2020-12-25T04:11:22+5:302020-12-25T04:11:22+5:30
पुणे : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. २५ डिसेंबर रोजी सुशासन दिवस साजरा होत असून, ...
पुणे : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. २५ डिसेंबर रोजी सुशासन दिवस साजरा होत असून, राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जिल्हा व मंडल कार्यालयातर्फे पक्षाचे नेते व कार्यकर्ते शेतकऱ्यांच्यासोबत किसान विकास सन्मान मेळाव्यात हा सुशासन दिवस साजरा करणार आहेत़, अशी माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली़
या कार्यक्रमांतर्गत पुण्यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे हडपसर येथे तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्याजवळ भुगाव येथे शेतकरी मेळाव्यात सुशासन दिवस साजरा करणार आहेत़ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुशासन दिनानिमित्त देशभरातील शेतकऱ्यांना दुपारी बारा वाजता संबोधित करणार असून, भाजपच्या राज्यातील सर्व जिल्हा व मंडल कार्यालयांतर्फे मोठ्या स्क्रीनवर हे भाषण दाखविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे़
----------------------
मराठा आरक्षणाबाबत किती प्रामाणिक हाच खरा प्रश्न
पुणे - राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किती प्रामाणिक आहे हाच खरा प्रश्न आहे़ असे सांगून माधव भंडारी यांनी यावेळी या तिनही पक्षांचा इतिहास पाहिला तर त्यांनी पहिल्यापासूनच मराठा आरक्षणाला विरोध केला असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले़ या सरकारची आरक्षणाबाबत कुठलीही ठाम भूमिका नाही, सकारात्मक नियोजन नसल्याचेही ते यावेळी म्हणाले़
राष्ट्रवादी काँगे्रस व नवाब मलिक हे खोटे बोलण्यात पटाईत असून, मलिक यांना दिवसाही आता स्वप्ने पडू लागली आहेत़ भाजपने आत्तापर्यंत कधी शेतकरी मेळावे घेतले नाहीत़ मग शेतकरी मेळाव्याला पक्षाचे कार्यकर्ते त्यांना कुठून दिसले असा प्रश्न उपस्थित करून भंडारी यांनी, भाजपचा शुक्रवारी होणारा शेतकरी मेळावा हा पहिलाच मेळावा असल्याचे स्पष्ट केले़
-----------------