आज १३३ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:44+5:302021-06-04T04:08:44+5:30

पुणे : महापालिकेच्या १३३ केंद्रांवर आज कोविशिल्ड, तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून, या सर्व ठिकाणी ...

Today Covishield is available at 133 centers, while Covacin is available at 16 centers | आज १३३ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन उपलब्ध

आज १३३ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन उपलब्ध

Next

पुणे : महापालिकेच्या १३३ केंद्रांवर आज कोविशिल्ड, तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून, या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत. ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्यासाठी आज (शुक्रवारी) सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार असून, केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांना यात नोंदणी करता येणार आहे़

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार: उपलब्ध कोविशिल्ड लसीच्या साठ्यापैकी ६० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग करून अपॉईन्मेंट घेतलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे. तर उर्वरित लस ही दिव्यांग नागरिक, स्तनदा माता, हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लसीकरण केंद्रावर ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे. तसेच, शिल्लक डोस हे १२ मार्च पूर्वी म्हणजे ८४ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस म्हणून उपलब्ध राहणार आहे.

-----

७ मे पूर्वी डोस घेतलेल्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध

ज्या नागरिकांनी ७ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १६ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़ कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही़

------------------------

Web Title: Today Covishield is available at 133 centers, while Covacin is available at 16 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.