आज ५६ केंद्रांवर कोव्हिशिल्ड, तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:12 AM2021-06-09T04:12:08+5:302021-06-09T04:12:08+5:30
पुणे : महापालिकेच्या ५६ केंद्रांवर बुधवारी (दि.९) ५६ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून, ...
पुणे : महापालिकेच्या ५६ केंद्रांवर बुधवारी (दि.९) ५६ केंद्रांवर कोविशिल्ड, तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून, या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत.
लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी बुधवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़ याव्दारे कोविशिल्डकरिता केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांना नोंदणी करता येणार असून, कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी १२ मे पूर्वी घेतला आहे त्यांनाही नोंदणी करता येणार आहे़
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार: उपलब्ध कोविशिल्ड लसीच्या साठ्यापैकी ६० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग करून अपॉईन्मेंट घेतलेल्यांना दिली जाणार आहे. तर उर्वरित ४० टक्के लस ही दिव्यांग नागरिक, स्तनदा माता, हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लसीकरण केंद्रावर ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाईल़ तसेच शिल्लक डोस हे १७ मार्चपूर्वी म्हणजे ८४ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस म्हणून उपलब्ध राहणार आहे.
-----
१२ मेपूर्वी डोस घेतलेल्याना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध
ज्या नागरिकांनी १२ मेपूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १६ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़ यातील ६० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ४० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे़ कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही़
------------------------