बारामतीत आज पाच तास वीजपुरवठा बंद
By admin | Published: June 2, 2016 12:37 AM2016-06-02T00:37:48+5:302016-06-02T00:37:48+5:30
तातडीच्या दुरुस्तीच्या व देखभालीच्या कामासाठी बारामती शहरातील काही भागांत गुरुवारी (दि. २) सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहील, असे महावितरणने कळविले आहे.
बारामती : तातडीच्या दुरुस्तीच्या व देखभालीच्या कामासाठी बारामती शहरातील काही भागांत गुरुवारी (दि. २) सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहील, असे महावितरणने कळविले आहे.
११ केव्ही अशोकनगर वाहिनीवरील अशोकनगर, साईगणेशनगर, आनंदनगर, अंबिकानगर, भिगवण रोड, ११ केव्ही गणेश मंदिर वाहिनीवरील सूर्यनगरी, सायली हिल, महिला सोसायटी, अमरदीप हॉटेल परिसर, संघवीनगर, कांचननगर, उत्कर्षनगर तसेच ११ केव्ही एअरपोर्ट वाहिनीवरील एमआयडीसी जी व एफ ब्लॉकमधील ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत बंद राहील. काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व वाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. काम वेळेआधी संपल्यास वीजपुरवठा त्याच वेळी पूर्ववत करण्यात येईल. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.