‘पुरूषोत्तम’चा जल्लोष आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 03:37 AM2017-08-08T03:37:56+5:302017-08-08T03:37:56+5:30
सणासुदीच्या हंगामात निसर्गाच्या अभूतपूर्व संक्रमणाने जसा आसमंतात नवनिर्मितीचा एक वेगळाच आल्हाददायी आविष्कार अनुभवायला मिळतो, तसाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सृजनशील अभिव्यक्तीमधून चैतन्य निर्माण करणारा काळ असतो तो ‘पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धे’चा!
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सणासुदीच्या हंगामात निसर्गाच्या अभूतपूर्व संक्रमणाने जसा आसमंतात नवनिर्मितीचा एक वेगळाच आल्हाददायी आविष्कार अनुभवायला मिळतो, तसाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सृजनशील अभिव्यक्तीमधून चैतन्य निर्माण करणारा काळ असतो तो ‘पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धे’चा! कलात्मक अभिव्यक्तीच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला ‘अरे आव्वाज कुणाचा?’च्या जल्लोषात आज (मंगळवार)पासून प्रारंभ होणार आहे. नव्या ४ संघांसह ५१ संघांमध्ये पहिल्या फेरीमध्ये कमालीची चुरस रंगणार आहे.
महाराष्ट्र कलोपासक संस्थेतर्फे दरवर्षी घेण्यात येणारी ही स्पर्धा महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी, यासाठी महाविद्यालयांची चढाओढ लागलेली असते.
यंदा स्पर्धेच्या कालावधीत गणोशोत्सव आल्यामुळे १६ आॅगस्टऐवजी ही स्पर्धा ८ आॅगस्टपासून सुरू होणार आहे.
स्पर्धेची सुरुवात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या ’वेध’ एकांकिकेने होणार आहे. त्याचबरोबर कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘साकव’ आणि नगरच्या प्रेमराज सारडा महाविद्यालयाची ‘ड्रायव्हर’
या एकांकिका सादर होणार
आहेत.
ही फेरी दि. २३ आॅगस्टपर्यंत रंगणार असून, पहिल्या फेरीचे परीक्षण आनंद पानसे, सचिन पंडित आणि रूपाली भावे करणार आहेत. स्पर्धेची अंतिम फेरी दि. ९ व १० सप्टेंबरला रंगणार आहे.
दि. ९ आॅगस्ट २०१७
१. सिम्बायोसिस कला वाणिज्य महाविद्यालय
एकांकिका - द कॉन्शन्स
२. शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय
एकांकिका - लाईफ बीयोंड झिरो
३. अप्पासाहेब जेधे महाविद्यालय
एकांकिका - सूर पारंब्या
दि. १० आॅगस्ट २०१७
१. ए.आय.एस.एस.एम.एस. महाविद्यालय
एकांकिका - खैरात
२. आबासाहेब गरवारे महाविद्यालय
एकांकिका - अफ्टर द डायरी
३. सिंहगड इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय
एकांकिका - चौकट
वेळ सायंकाळी ५ ते ८
११ आॅगस्ट २०१७
१. एम.आय.टी. महाविद्यालय
एकांकिका - चरखा विकणे आहे
२. आय.एम.सी.सी. महाविद्यालय
एकांकिका - तुझा माझ्यावर भरोसा नाही का?
३. फर्ग्युसन महाविद्यालय
एकांकिका - भेट
वेळ सायंकाळी ५ ते ८
१२ आॅगस्ट २०१७
१. गरवारे वाणिज्य महाविद्यालय
एकांकिका - मुकुंद कोणी हा पहिला
२. न्यू आर्ट्स, कॉमर्स & सायन्स महाविद्यालय अहमदनगर
एकांकिका - माईक
३. जी.एस. रायसोनी महाविद्यालय
एकांकिका - दुसरी बाजू
१३ आॅगस्ट २०१७
१. पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय
एकांकिका - माझ्या छत्रीचा पाऊस
२. व्ही.आय.आय.टी. महाविद्यालय
एकांकिका - कोंडी
३. श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय
एकांकिका - प्रमेय
१. पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय
एकांकिका - माझ्या छत्रीचा पाऊस
२. व्ही.आय.आय.टी. महाविद्यालय
एकांकिका - कोंडी
३. श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय
एकांकिका - प्रमेय
१. बी.एम.सी.सी. महाविद्यालय
एकांकिका - सॉरी परांजपे
२. स.प. महाविद्यालय
एकांकिका - भूमिका
३. एन.बी.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय
एकांकिका - युगांतर
१४ आॅगस्ट २०१७
१. टिळक आयुर्वेद महाविद्यालय
एकांकिका - घाटावरचा नाव
२. पी.आय.सी.टी. महाविद्यालय
एकांकिका - फिर्याद
३. एम.एम.सी.ओ.ई. महाविद्यालय
एकांकिका - पिछान
१६ आॅगस्ट २०१७
१. कावेरी आटर््स, सायन्स कॉमर्स महाविद्यालय
एकांकिका - शब्दातीत
२. जयक्रांती महाविद्यालय
एकांकिका - सोचके बाहर
३. एम.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय
एकांकिका - कर्णिक
१७ आॅगस्ट २०१७
१. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
एकांकिका - गुंतता हृदय हे
२. एम.आय.टी. महाविद्यालय
एकांकिका - मास्तुरी
३. डी.वाय. पाटील महाविद्यालय
एकांकिका - बोन्साय
१८ आॅगस्ट २०१७
१. कमलनयन महाविद्यालय बारामती
एकांकिका - ब्लॅक रोज
२. डी. वाय. पाटील हॉटेल मॅनजमेंट महाविद्यालय
एकांकिका - अनामिक
३. आय.एल.एस. विधी महाविद्यालय
एकांकिका - सहा बाय आठ
१९ आॅगस्ट २०१७
१. इंदिरा कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय
एकांकिका - परोश
२. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय
एकांकिका - अगम्य
३. प. वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय
एकांकिका - शार्यचक्र
सायंकाळी - ५ ते ८
२० आॅगस्ट २०१७
१. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ महाविद्यालय
एकांकिका - दिल अभी भरा नहीं
२. पी.ई.एस. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय
एकांकिका - ए.एस.एल. प्लीज
३. एम.एम.सी.सी. महाविद्यालय
एकांकिका - विसर्जन
१. पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय
एकांकिका - बाकी शून्य
२. भिवराभाई सावंत महाविद्यालय
एकांकिका - रेघ
३. श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय
एकांकिका - साने आणि कंपनी
२१ आॅगस्ट २०१७
१. मॉडर्न कॉमर्स आर्टस् आणि सायन्स महाविद्यालय
एकांकिका - सावल्या
२. अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर
एकांकिका - वळण
३. ढोले-पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय
एकांकिका - घरमालक
वेळ - सायंकाळी ५ ते ८
२२ आॅगस्ट २०१७
१. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय
एकांकिका - उद्या? की आजच?
२. शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय
एकांकिका - खोटे कोणी बोलत नाही
३. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय
एकांकिका - विळखा
२३ आॅगस्ट २०१७
१. सिंहगड अॅकॅडेमी अभियांत्रिकी महाविद्यालय
एकांकिका - खलल
२. जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट आॅफ अभियांत्रिकी महाविद्यालय
एकांकिका - झेड पी
३. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय
एकांकिका - इन बिट बिन