पारुंडेत आज ध्वजारोहण सोहळा

By admin | Published: September 23, 2015 03:34 AM2015-09-23T03:34:41+5:302015-09-23T03:34:41+5:30

दर बारा वर्षांनी श्रीक्षेत्र पारुंडे (ता. जुन्नर) येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या बुधवारी (दि. २३) दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Today, flag hoisting ceremony in Parund | पारुंडेत आज ध्वजारोहण सोहळा

पारुंडेत आज ध्वजारोहण सोहळा

Next

लेण्याद्री : दर बारा वर्षांनी श्रीक्षेत्र पारुंडे (ता. जुन्नर) येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या बुधवारी (दि. २३) दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होईल़
साधू-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या ध्वजारोहण सोहळ्याने या कुंभमेळ्याचा आरंभ होत आहे, अशी माहिती आमदार शरद सोनावणे यांनी जुन्नर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. नाशिक येथून आलेल्या नाथपंथीय साधूंचे जुन्नर तालुक्यात भक्तिभावपूर्ण वातावरणात आगमन झाले आहे. त्यांचे आळेफाटा, पिंपळवंडी ग्रामस्थांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. पारुंडे येथील ब्रह्मनाथ मंदिरातील कालिकामातेचे महाद्वार या औचित्याने १२ वर्षांनी उघडणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ध्वजारोहण समारंभाने कुंभमहापर्वाला आरंभ होत आहे. या समारंभास योगी निर्मलनाथ, योगी कृष्णनाथ, योगी सोमवारनाथ, योगी सुमरनाथ, महंतयोगी सूरजनाथजी, पीरयोगी गंगानाथजी यांच्यासह बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: Today, flag hoisting ceremony in Parund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.