पुण्यात " ती " अनुभवणार आज ‘मिडनाईट बाईक रॅली’चा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 12:20 PM2019-09-04T12:20:10+5:302019-09-04T12:27:20+5:30
‘लोकमत’च्यावतीने मिडनाईट बाईक रॅलीच्या माध्यमातून शहरांतील रस्त्यांवरून महिला सुरक्षेचा जागर केला जाणार आहे.
पुणे : आज ‘ती’ प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे, ‘ति’चे प्रत्येक पाऊल यशाचे शिखर गाठत आहे, ‘ती’ सज्ज आहे... कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी... अन् तिच्या धैर्याला सलाम करण्यासाठी पुण्यनगरीही... हाच संदेश घेऊन आज (दि. ४) ‘लोकमत’च्यावतीने मिडनाईट बाईक रॅलीच्या माध्यमातून शहरांतील रस्त्यांवरून महिला सुरक्षेचा
जागर केला जाणार आहे. या रॅलीमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी या विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.
पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी पाऊल टाकत ‘ती’चा गणपती हा अभिनव उपक्रम ‘लोकमत’च्यावतीने सुरू करण्यात आला आहे. यंदा या उपक्रमाचे आठवे वर्ष आहे. गणेशोत्सवातील मूर्तीच्या प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंतच्या प्रत्येक कार्यात महिलांना स्थान देण्याची चळवळ सुरू करून ‘लोकमत’ने ‘ती’च्या सन्मानासाठी पुढाकार घेतला आहे. महिलांची मिड नाईट बाईक रॅलीचा हा या उपक्रमाचाच एक भाग आहे. रॅलीच्यानिमित्ताने पुणे शहर हे महिलांसाठी रात्रीच्या वेळीही सुरक्षित असावे, दुचाकीवरून त्या रात्रीही सुरक्षितपणे शहरात फिरू शकतात, असा संदेश देण्यात येणार आहे. या रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महिला सुरक्षेचा हा जागर करणारी ही रॅली रात्री १० वाजता पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सात ठिकाणांहून निघणार आहे. ‘सुरक्षित पुणे’ असे फलक हातात घेऊन हजारो महिला एकाच वेळी शहरातील विविध रस्त्यांवरून महिला सुरक्षेचा संदेश देणार आहेत.
बीएमसीसी महाविद्यालया-शेजारील महावीर जैन होस्टेलच्या प्रांगणात रात्री १२ वाजता रॅलीचा समारोप होईल. फिनोलेक्स पाईप्स प्रस्तुत आणि कॅलेक्स ग्रुप ऑफ कंपनीच्या सहयोगाने, तसेच खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी, काका हलवाई स्वीट सेंटर आणि डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांच्या विशेष सहकार्याने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. केकीज इंडियाच्या संचालिका स्वाती वायदंडे या रॅलीच्या फूड पार्टनर आहेत. सर्व सखी मंच सदस्यांना या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
.......
‘लोकमत’ने ‘ती’चा गणपती हा अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. गणेशोत्सवात महिलांना मान मिळवून देण्यासाठी हे पुरोगामी पाऊल टाकले आहे. तसेच मिडनाईट बाईक रॅलीच्या माध्यमातून महिला सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.
महिलांसाठी रात्रीच्यावेळीही पुणे सुरक्षित आहे, हा संदेश सर्वत्र जायला हवा.
- प्रकाश छाब्रिया,
कार्यकारी अध्यक्ष, फिनोलेक्स पाईप्स
....
महिलांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने मिडनाईट बाईक रॅलीच्या माध्यमातून ‘लोकमत’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. आज महिला सर्वच क्षेत्रांत पुढे आहेत. पुरुषांच्याबरोबरीने त्या काम करीत आहेत. त्यामुळे त्यांची सुरक्षितता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. रॅलीच्या माध्यमातून समाजात हा संदेश पोहोचला जाईल.
- गौरव सोमाणी,
कार्यकारी संचालक, कॅलेक्स ग्रुप ऑफ कंपनीज
* रॅलीचे मार्ग पुढीलप्रमाणे :
आपल्या विभागातून रॅलीमध्ये सहभागासाठी लोकमत प्रतिनिधीशी संपर्क साधावा.
रॅली क्रमांक १ - अप्पा बळवंत चौक- गुरुजी तालीम मंडळ -शगुन चौक, अलका थिएटर चौक- खंडूजीबाबा चौक- फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालय : योगेश शिंदे मो. ८८०५००९३८२/
अमित अंगीर मो. ८४५९५१३१५१
रॅली क्रमांक २ - येरवडा- गुंजन चौक- जहाँगीर हॉस्पिटल- आरटीओ- संचेती हॉस्पिटल- जंगलीमहाराज रस्ता- खंडूजीबाबा चौक- फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालय : बाबाजी शिंदे
मो. ९८८१५१३५००
रॅली क्रमांक ३ - हडपसर मेगा सेंटर- बिगबझार चौक- गोळीबार मैदान- स्वारगेट- टिळक रोड - खंडूजीबाबा चौक फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालय : संदीप पवार मो. ९०११५०७६३८
रॅली क्रमांक ४ - अहिल्यादैवी चौक सातारा रोड- सिटी प्राईड चौक- लक्ष्मीनारायण थिएटर- गणेश कला क्रीडा मंच- टिळक रोड- फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालय : दीपक पिलावरे मो. ९०११०३८२८७/ संजय जाधव मो. ८८८८८९२०१९
रॅली क्रमांक ५ - वडगाव पूल- सिंहगड रस्ता- राजाराम पूल- मातोश्री वृद्धाश्रम- ताथवडे उद्यान- करिष्मा सोसायटी रोड- कर्वे रस्ता- एसएनडीटी महाविद्यालय- लॉ कॉलेज रस्ता- महावीर जैन छात्रालय : अमित शर्मा मो. ९९२२९१०७५८
रॅली क्रमांक ६ - बालेवाडी- बालेवाडी फाटा बाणेर रस्ता-परिहार चौक ब्रेमेन चौक औंध विद्यापीठ-सेनापती बापट रोड-बीएमसी-महावीर जैैन छात्रालय : योगेश भालेराव मो. ९०६७०४७३३३
रॅली क्रमांक ७ - लोकमत पिंपरी कार्यालय- बोपोडी-वाकडेवाडी-संचेती हॉस्पिटल-जंगलीमहाराज रस्ता-गरवारे पूल-फर्ग्युसन कॉलेज रस्ता- महावीर जैन छात्रालय : संकेत कल्याणकर मो. ९४०४५१७१००