आज उन्हाचा कडाका
By admin | Published: February 21, 2017 03:35 AM2017-02-21T03:35:12+5:302017-02-21T03:35:12+5:30
मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली असून
पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली असून, मंगळवारी होणाऱ्या मतदानाच्या वेळी उन्हाचा कडाका जाणविणार आहे़ विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट, तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे ३८़८ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी तापमान जळगाव येथे १४़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़
मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ६ अंशाने वाढ झाली असून, कोकण किनारपट्टीच्या भागात २ ते ३ अंश, तर मराठवाड्यात ३ ते ४ अंश आणि विदर्भात ३ ते ६ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे़