आज महापालिकेच्या केवळ ५६ केंद्रांवर लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:45+5:302021-06-16T04:12:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाकडून नव्याने लसीचा पुरवठा न झाल्याने, मंगळवारी (दि. १५) महापालिकेच्या केवळ ५६ केंद्रांवर ...

Today, the vaccine is available at only 56 NMC centers | आज महापालिकेच्या केवळ ५६ केंद्रांवर लस उपलब्ध

आज महापालिकेच्या केवळ ५६ केंद्रांवर लस उपलब्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्य शासनाकडून नव्याने लसीचा पुरवठा न झाल्याने, मंगळवारी (दि. १५) महापालिकेच्या केवळ ५६ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे, तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे़

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेल्या १०० डोसपैकी ४० टक्के कोविशिल्ड लस व ६० टक्के कोव्हॅक्सिन लस या आॅनलाइन अपॉइंटमेंट /स्लॉट बुक केलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिल्या जाणार आहे़

लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी मंगळवारी सकाळी ८ वाजता आॅनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़ कोविशिल्ड लसीच्या साठ्यापैकी ४० टक्के लस ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी (२३ मार्चपूर्वी) पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस म्हणून दिली जाणार आहे़ तसेच उर्वरित २० टक्के लसही हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे़

-----

१७ मे पूर्वी डोस घेतलेल्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध

ज्या नागरिकांनी १७ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १६ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़ यातील ६० टक्के लस ही आॅनलाईन नोंदणी केलेल्यांना व ४० टक्के लस ही आॅनस्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे़ कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही़

------------------------

Web Title: Today, the vaccine is available at only 56 NMC centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.