पालखी सोहळ्याबाबत आज नियोजन ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:24+5:302021-05-28T04:09:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी उपमुख्यमंत्री ...

Today will be the planning for the Palkhi ceremony | पालखी सोहळ्याबाबत आज नियोजन ठरणार

पालखी सोहळ्याबाबत आज नियोजन ठरणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवार (दि.२८) बैठक आयोजिली आहे. या बैठकीत पालखी सोहळ्याबाबत निर्णय होणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज संस्थानसह राज्यातील प्रमुख संस्थानांनी आषाढीवारीबाबत प्रस्ताव ठेवले आहेत, यावर चर्चा होणार आहे. यंदा आषाढी एकादशीचा सोहळा २० जुलै २०२१ रोजी साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी गतवर्षी राज्यातील संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत चांगावटेश्वर व माता रुक्मिणी या मानाच्या ९ पालख्यांना एसटी बसने एक दिवसाच्या वारीला शासनाने परवानगी दिली होती.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणावे लागल्यानंतर यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. कोरोनाचे निर्बंध चालतील मात्र बंदी नको, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. अजित पवार हे देहू, आळंदी आणि इतर मानाच्या सात पालखी सोहळा संस्थांशी चर्चा करणार असून यातून मार्ग निघेल, अशी वारकरी संप्रदायाला अपेक्षा आहे.

यंदा २० जुलै रोजी आषाढी एकादशी असून १ जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर २ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याने मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यात सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाची साथ असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची हा पेच सरकारच्या पुढे आहे.

-----

Web Title: Today will be the planning for the Palkhi ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.