‘लोकमत’च्या वर्धापनदिनी आज स्नेहीजनांचा मेळा

By admin | Published: December 28, 2016 04:29 AM2016-12-28T04:29:33+5:302016-12-28T04:29:33+5:30

वाचकांनी भरभरून दिलेल्या पाठबळावर ‘लोकमत’ने पुण्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवित १७ वर्षे पूर्ण करून, १८व्या वर्षात पदार्पण केले आहे़ हेच प्रेम वृद्धिंगत करण्याचे

Today's celebration of 'Lokmat' is celebrated today by the Friends of Snehijan | ‘लोकमत’च्या वर्धापनदिनी आज स्नेहीजनांचा मेळा

‘लोकमत’च्या वर्धापनदिनी आज स्नेहीजनांचा मेळा

Next

पुणे : वाचकांनी भरभरून दिलेल्या पाठबळावर ‘लोकमत’ने पुण्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवित १७ वर्षे पूर्ण करून, १८व्या वर्षात पदार्पण केले आहे़ हेच प्रेम वृद्धिंगत करण्याचे निमित्त साधण्यासाठी उद्या बुधवार (दि़२८) सिंहगड रस्त्यावरील ‘लोकमत’ कार्यालयात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे़
गेल्या १७ वर्षांत पुणेकरांच्या पाठबळावर ‘लोकमत’ने पुण्यात प्रथम क्रमांकाच्या दैनिकाचे स्थान मिळविले आहे. अनेक उपक्रमांचा श्रीगणेशा करीत ‘लोकमत’ने पुणेकरांच्या आशा-आकांक्षा पूर्ण केल्या आहेत.
पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सातत्याने जागर मांडला आहे. पुण्याच्या नागरी प्रश्नांना ‘आता बास’, ‘कशासाठी पुण्यासाठी’ यांसारख्या मोहिमांमधून वाचा फोडली.
नागरी समस्यांना वाचा फोडल्यामुळे प्रशासनावर विधायक अंकुश निर्माण झाला व त्यांना या प्रश्नांची दखल घेणे भाग पडले व अनेक प्रश्न मार्गीदेखील लागले. त्यातून ‘लोकमत’ने पुणेकरांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले.
पुण्याच्या विकासासाठी उत्तरे शोधण्यासाठी ‘व्हिजन पुणे’, ‘बिल्डिंग पुणे’ यांसारखे उपक्रम राबविले. समाजातील सर्व घटकांना त्यामध्ये सहभाग घेता यावा, यासाठी ‘मी पत्रकार’ हा अभिनव उपक्रम राबविला.
अनेक प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ‘लोकमत’ने सुरू केलेला ‘ती’चा गणपती हा उपक्रम
तर महिला सन्मानाची चळवळ
बनला आहे.
वृत्तपत्र म्हणजे, लोकशाहीचा चौथा स्तंभ, याचे भान ठेवून साहित्य, संस्कृती, कला अन् विद्येच्या या माहेरघरात या परंपरेला साजेशी भूमिका घेतल्यानेच पुणे शहरात ‘लोकमत’ रुजला आणि वाढला़ प्रगतीची गरूडभरारी घेत, ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट करीत, समाजहितासाठी आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोनाचा पाया मजबूत करीत ‘लोकमत’ची दमदार वाटचाल सुरू आहे़
ऋणानुबंधाच्या या गाठी आणखी घट्ट करण्यासाठी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याला वाचक, लेखक, विक्रेते, जाहिरातदार, वितरक, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे संपादक विजय बाविस्कर आणि वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Today's celebration of 'Lokmat' is celebrated today by the Friends of Snehijan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.