‘बुधभूषण’चे आज सामूहिक वाचन
By admin | Published: May 12, 2017 05:06 AM2017-05-12T05:06:03+5:302017-05-12T05:06:56+5:30
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे शुक्रवारी(दि.१२) सायंकाळी ६ वाजता संभाजी महाराज लिखित
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे शुक्रवारी(दि.१२) सायंकाळी ६ वाजता संभाजी महाराज लिखित ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथाच्या शरद गोरेलिखित अनुवादाचे सामूहिक वाचन केले जाणार आहे. श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम होईल.
संघटनेचे केंद्रीय निरिक्षक विकास पासलकर यांनी माहिती देताना सांगितले की, डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १३ मे रोजी दीपोत्सव, मशाल उत्सव केला जाणार असून १४ मे रोजी सकाळी १० वाजता संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. ‘बुधभूषण’ या ग्रंथानेच हा पुष्पहार तयार केला जाणार आहे. ही पुस्तके शंभुप्रेमी आणि विद्यार्थ्यांना वाटप केली जाणार आहेत. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, सभागृह नेते दीपक मानकर आदी उपस्थित राहणार आहेत.
जयंतीनिमित्त संभाजी महाराज पुतळ्यापासून दुचाकींची रॅली पुरंदर किल्ल्यापर्यंत काढली जाणार आहे. रॅलीच्या उपक्रमाचे यंदाचे १६ वे वर्ष आहे. प्रशांत धुमाळ, संतोष शिंदे, सिद्धार्थ कोंढाळकर, सागर आल्हाट, हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, मयूर शिरोळे, संजय शिरोळे, विराज तावरे आदी कार्यकर्ते जयंती कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. पुरंदर किल्ल्यावर तालुकाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी संभाजीराजे गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे पासलकर यांनी सांगितले.