मोटारचालक महिलेच्या जामिनाचा आज निर्णय

By admin | Published: April 27, 2017 05:13 AM2017-04-27T05:13:25+5:302017-04-27T05:13:25+5:30

बाणेर येथील अपघातात माय-लेकींच्या मृत्यूस कारण ठरल्याच्या प्रकरणात मोटारचालक महिलेचा जामिन अर्ज रद्द करावा, अशी मागणी

Today's decision on the bailout of a motorcycle woman | मोटारचालक महिलेच्या जामिनाचा आज निर्णय

मोटारचालक महिलेच्या जामिनाचा आज निर्णय

Next

पुणे : बाणेर येथील अपघातात माय-लेकींच्या मृत्यूस कारण ठरल्याच्या प्रकरणात मोटारचालक महिलेचा जामिन अर्ज रद्द करावा, अशी मागणी सरकारपक्षाने केली होती. त्या अर्जाबाबत बचाव पक्षाने व सरकारपक्षाने आपला युक्तिवाद बुधवारी केला. त्यावर न्यायालय उद्या (गुरुवारी) निकाल देणार आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सुजाता जयप्रकाश श्रॉफ (रा.आपटे रस्ता, शिवाजीनगर) असे मोटारचालक महिलेचे नाव आहे. १७ एप्रिल रोजी दुपारी ३च्या सुमारास रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकावर उभ्या असलेल्या पाच जणांना मोटारीने धडक दिली होती. त्यामध्ये माय-लेकीच्या मृत्यू झाला. या प्रकरणी श्रॉफ यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०४ (अ) (निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारण होणे) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे कलम जामिन पात्र असल्यामुळे अवघ्या काही तासात सुजाता यांना जामिन मिळाला. त्यामुळे या प्रकरणात ३०४ (सदोष मनुष्यवध) कलम लावण्याचा अर्ज पोलिसांनी न्यायालयात केला आहे. बचाव पक्षातर्फे हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, ३०४ हे कलम लावले तरी एकदा दिलेला जामिन रद्द करता येत नाही. कलम ४६३ च्या तरतुदीनुसार जामिन दिला असल्याने सरकार पक्षाला सत्र किंवा उच्च न्यायालयात अर्ज करावा लागेल.
निंबाळकर यांनी युक्तिवाद करताना नमूद केले की, जामिन फेटाळण्यासाठी परिस्थिती असावी लागते. ३०४ कलम लावण्यासाठी आरोपीने मद्यप्राशन करणे किंवा विनापरवाना वाहन चालविणे असे काही कारण असावे लागते. दरम्यान, या अपघाताचा तपास करण्यासाठी श्रॉफ यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.

Web Title: Today's decision on the bailout of a motorcycle woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.