ग्रामपंचायतींचा आज निकाल; एकेरीवाडीत लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:17 AM2019-02-25T00:17:04+5:302019-02-25T00:17:08+5:30

कार्यकर्ते परस्परांना भिडले : ग्रामपंचायत निवडणूक

Today's Gram Panchayats result; Ladders in singles | ग्रामपंचायतींचा आज निकाल; एकेरीवाडीत लाठीमार

ग्रामपंचायतींचा आज निकाल; एकेरीवाडीत लाठीमार

Next

केडगाव : केरीवाडी (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यवत पोलिसांनी लाठीचार्जचा वापर करीत कार्यकर्त्यांवर हल्ला केला व अनियंत्रित जमाव नियंत्रणात आणला.


पोलिसांनी आपला खाक्या दाखवत जमाव पांगविला. अवघ्या तेराशे मतदान असणाऱ्या एकेरीवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केली होती. निवडणूक सुरू झाल्यापासून या निवडणुकीत दोन्ही गटांनी अनेकदा वाद घातले. विशेषत: प्रभाग क्रमांक एकमध्ये दोन्ही मतदान प्रतिनिधी बºयाचदा एकमेकांशी वाद घालत होते. अखेरीस उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, सहायक पोलीस निरीक्षक यादव व वाघमोडे यांच्यासह पोलीस ठाण्याची जवळपास वीस पोलिसांची फौज या गावांमध्ये दाखल झाली. त्यांनी आपला खाक्या दाखवत जमावाला नियंत्रणात आणले. या निवडणुकीमध्ये मतदारयादीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले.

बºयाचदा काही मतदारांची नावे एका एका प्रभागातून दुसºया प्रभागांमध्ये गेलेली दिसत होती, तर काही मतदारांची नावे दुबार आली होती, तर काही मतदारांची नावे एकेरीवाडीमधून देलवडीमध्ये गेल्याचे दिसत होते. त्यामुळे मतदान करण्यावर बºयाचदा गोंधळ उडत होता. दोन्ही गटांनी मतदार आणण्यासाठी शेवटपर्यंत निकराचे प्रयत्न केले. एकूणच आजच्या वातावरणावरून ही निवडणूक चुरशीची होईल, असे एकंदरीत चित्र आहे.

कासारी निवडणुकीत ८७.१९% मतदान
रांजणगाव गणपती : कासारी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ८७.१९% मतदान झाले असून कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शांततेत संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष नलावडे यांनी सांगितले.

या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवडणार असून त्यासाठी अनिता संदीप भुजबळ आणि सुनीता सुखदेव भुजबळ यांच्यात सरळ लढत होत आहे. एकूण ९ जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यापैकी २ जागा यापूर्वी बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. आता फक्त ७ जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ३ अधिकारी व २२ पोलीस कर्मचाºयांसह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता सरपंचपदासह इतर ७ जागांमध्ये कोण उमेदवार बाजी मारतील, हे मतमोजणीनंतरच समजेल. त्यामुळे ग्रामस्थांची निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Web Title: Today's Gram Panchayats result; Ladders in singles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.