महात्मा फुले साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन
By admin | Published: November 26, 2014 11:29 PM2014-11-26T23:29:26+5:302014-11-26T23:29:26+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सातवे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (दि. 27) महात्मा फुले यांच्या मूळगावी होत आहे.
Next
खळद : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सातवे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (दि. 27) महात्मा फुले यांच्या मूळगावी होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. सय्यद जब्बार पटेल असतील. तर पोपटराव कटके स्वागताध्यक्ष आहेत.
सकाळी 9 वाजता सरपंच चंद्रकांत फुले यांच्या हस्ते साहित्य ज्योत व ग्रंथ दिंडी मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. अकरा वाजता उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
दुपारी 2 वाजता ‘मी जोतिराव फुले बोलतोय’ हा सिद्धार्थ मोरे व सुप्रिया मोरे यांचा कार्यक्रम होणार आहे. तीन वाजता महात्मा फुले यांचे सामाजिक विचार हा परिसंवाद होणार असून, दशरथ यादव, संदीप तापकीर, शेलेंद्र बेल्हेकर मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर अरुण गिरी यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार असून, यात जया रसाळ व माधव पाटील सहभाग घेणार आहेत.
सायंकाळी डॉ. दिगंबर दुर्गाडे, फुलचंद नागटिळक यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन होणार आहे. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, सरचिटणीस दशरथ यादव, उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, दत्ता भोंगळे, राजाभाऊ जगताप, नंदकुमार दिवसे, चंद्रकांत फुले, रवींद्र फुले, चंद्रकात टिळेकर, सुनील धिवार, सुजाता गुरव, रामभाऊ गिरमे, गंगाराम जाधव, दत्ता होले आदींनी संयोजन केले आहे. (वार्ताहर)