‘पुणे प्रॉपर्टी शोेकेस’चे आज उद्घाटन
By admin | Published: March 25, 2017 04:10 AM2017-03-25T04:10:06+5:302017-03-25T04:10:06+5:30
पुण्यातील घराचे स्वप्न साकार करण्यासाठी विविध पर्याय मिळावेत, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या गृहप्रदर्शनाचे आयोजन
पुणे : पुण्यातील घराचे स्वप्न साकार करण्यासाठी विविध पर्याय मिळावेत, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या गृहप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारपासून (दि. २५ मार्च) या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
गणेश कला क्रीडा मंच येथे भरणाऱ्या या भव्य गृहप्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता गार्डियन कॉर्पोरेशनचे संचालक उदय जाधव यांच्या हस्ते होणार आहे़ या वेळी बँक आॅफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक राजकिरण भोईर यांची प्रमुख उपस्थिती आहे.
गेल्या पाच वर्षांपासून ‘लोकमत’‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या नावाने पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करीत आहे. हजारो पुणेकरांचे घराचे स्वप्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे.
यंदाचे या उपक्रमाचे हे यशस्वी सहावे वर्ष असून, यामध्ये पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे १५0 हून अधिक गृहप्रकल्प पाहता येणार आहेत. या गृहप्रदर्शनात अफोर्डेबल होम्स, लक्झुरियस होम्स, व्यावसायिक प्रकल्प, बंगलो प्लॉट्स, ओपन प्लॉट्स असे प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय या वेळी पुणेकरांना पाहता येणार आहेत़
पुणे, पिंपरी-चिंचवड व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्यामुळे या प्रदर्शनामध्ये वेळेची व पैशाची बचत होणार आहे़
आपल्या स्वप्नातील व आपल्या गरजेप्रमाणे हवे असणारे मनपसंत घर येथे इच्छुक ग्राहकांना पाहता येणार आहे़ या प्रदर्शनासाठी बांधकाम व्यावसायिकांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक योजना आखल्या आहेत़ त्यांचाही लाभ या प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना मिळणार आहे़ गेल्या ५ वर्षांमध्ये पुण्यातील अनेक इच्छुकांनी आपले पुण्यातील घर नक्की करत, हे प्रदर्शन
यशस्वी बनविण्यास मदत केली आहे़ पुण्यातील गृहप्रकल्पांची सखोल व सविस्तर माहिती मिळण्याची संधी शनिवार, दि़ २५ व रविवार, दि़ २६ मार्च २०१७ रोजी असून, इच्छुक नागरिकांनी या भव्य प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या गृहस्वप्नांची पूर्तता करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे़ या प्रदर्शनास बँकिंग पार्टनर बँक आॅफ महाराष्ट्र आहे. आउटडोअर पार्टनर सुरेखा कम्युनिकेशन आहे.