आजची स्त्री सबला : डॉ. अनुराधा कांडलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:11 AM2021-03-10T04:11:07+5:302021-03-10T04:11:07+5:30
कळंब येथील फडतरे नॉलेज सिटी मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला व त्यांचे आरोग्य या विषयावर ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ ...
कळंब येथील फडतरे नॉलेज सिटी मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला व त्यांचे आरोग्य या विषयावर ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ अनुराधा कांडलकर यांनी आहार-विहार प्राणायाम व परिश्रम याबद्दल विद्यार्थिनी व महिलांना मार्गदर्शन केले. 'स्त्री शिक्षण ', 'महिला सक्षमीकरण' , महिलांनी घ्यावयाचा आहार, व प्रामुख्याने 'स्त्री भ्रूण हत्येस विरोध' या विषयावर विचार व्यक्त करत कार्यक्रमास उपस्थित सर्वांकडून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याची शपथ घेतली.महिला दिना निम्मित सर्व विभागातील विद्याथीर्नींनी विविध कला गुणांचे उत्स्फूर्तपणे सादरीकरण केले. डॉ.अनुराधा कांडलकर, संस्थेच्या संचालिका उज्ज्वला फडतरे, संगीता फडतरे,श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मेडीयम स्कूलच्या प्राचार्या अनिता भाटिया, कै.साहेबराव फडतरे ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या धनश्री जमदाडे ,बाबासाहेब फडतरे पॉलीटेकनिकच्या मनाली निंबाळकर, मोनिका आखाडे, कै.लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज आॅफ फार्मसीच्या सायली खडके व संस्थेतील सर्व महिला शिक्षक वर्ग उपस्थित होते.
--------------------------
फोटो ओळी : कळंब येथील फडतरे नॉलेज सिटी मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ अनुराधा कांडलकर यांनी मार्गदर्शन केले.
०९०३२०२१-बारामती-१३
--------------------------