पुणे स्थानकावरील शौचालये कुलूप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:57+5:302021-07-08T04:09:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक तीन, चार व सहावरील शौचालयांना कुलूप लावून बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक तीन, चार व सहावरील शौचालयांना कुलूप लावून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यात काही दिव्यांगांसाठी बनविलेल्या शौचालयांचादेखील समावेश आहे. शौचालये बंद असल्याने प्रवाशांना पादचारी पूल चढून फलाट एक वर यावे लागते. शिवाय त्यासाठी त्यांना पैसेही मोजावे लागत आहेत.
पुणे स्थानकावरील फलाट एक वर पे अँड युज शौचालय आहे. मात्र, अन्य फलाट वरील मोफत असलेले शौचालय
बंद अवस्थेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. स्थानकावरील प्रवासी सुविधांची जबाबदारी आयआरएसडीसी (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यांची आहे. मात्र त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
बॉक्स १
स्वच्छतेचा प्रश्न :
पुणे स्थानकावर स्वच्छतेसाठी जवळपास १८० कर्मचारी काम करीत. मात्र, लॉकडाऊनच्या काळात गाड्या बंद झाल्याचे कारण सांगून आयआरएसडीसीने जवळपास १५० कर्मचारी कामावरून काढून टाकले. आता ३० कर्मचाऱ्याकडून स्वच्छतेचे काम केले जात आहे. त्यामुळे अनेकदा फलाटावर, पादचारी पुलावर, ट्रॅकवर अस्वच्छता आढळून येते.तर अनेकदा कचरा उशिरा उचलणे असे प्रकार घडून येत आहे.