टोलनाक्याचा विरोध मावळला

By admin | Published: February 18, 2017 02:58 AM2017-02-18T02:58:31+5:302017-02-18T02:58:31+5:30

पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथील टोलनाक्यावर टोल सुरू करण्यास बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. अगोदर

Tolanakya's opposition was overwhelming | टोलनाक्याचा विरोध मावळला

टोलनाक्याचा विरोध मावळला

Next

पिंपळवंडी : पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथील टोलनाक्यावर टोल सुरू करण्यास बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. अगोदर सर्व समस्या सोडवा आणि मगच टोल सुरू करा,अशी ठोस भूमिका घेतल्याने हा टोलनाका सुरू होईल, की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. परंतु राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने तत्काळ कामे मार्गी लावल्यामुळे या टोलनाक्यावर गुरुवारी (दि. १६) मध्यरात्री बारा वाजल्यापासून टोल आकारणी करण्यास सुरुवात केली असून, स्थानिक नागरिकांना या टोलमधून सवलत देण्यात आली आहे.
पुणे-नाशिक महामार्गाचे राजगुरुनगर ते सिन्नर या दरम्यान रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या एकून १३८ किलोमीटर पैकी फक्त १०५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. कामाच्या ७५ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर टोलनाका सुरू करण्याचा नियम असल्यामुळे या कामास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला होता; त्यामुळे संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा आणि जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथील टोलनाका शनिवार (दि.११) पासून सुरू करण्यात येणार होता. परंतु, येथील बाधित शेतकऱ्यांचे आणि आळे येथील ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न सुटल्यामुळे उपविभागीय अधिकारी व आयएलएफएसचे अधिकारी यांनी शेतकरी व आळे ग्रामस्थांबरोबर आळेफाटा येथील सावतामाळी मंदिरात बैठक घेतली. या बैठकीत बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. आळे येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात यावे, पिंपळवंडी येथील स्मशानभूमीची कामे करा आणि मगच टोल आकारणी करण्यास सुरुवात करा, अशी ठोस आणि आक्रमक भूमिका घेतल्यामुळे टोल आकारणी बंद करण्यात आली होती. येथील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दणका दिल्यानंतर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने आळे येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम पिंपळवंडी येथील स्मशानभूमीचे व पिंपळवंडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यास सुरुवात केल्यामुळे हा टोलनाका सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Tolanakya's opposition was overwhelming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.