सामान्यांच्या खिशावर टोल'धाड', १० टक्यांनी वाहनांची दरवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 09:55 AM2022-04-01T09:55:43+5:302022-04-01T09:56:16+5:30

कार, जीप, व्हॅन व सर्व प्रकारच्या खासगी चारचाकीसाठी एकेरी प्रवासासाठी ११० रुपये दर आकारण्यात आले

Toll on ordinary people's pockets increased by 10% | सामान्यांच्या खिशावर टोल'धाड', १० टक्यांनी वाहनांची दरवाढ 

सामान्यांच्या खिशावर टोल'धाड', १० टक्यांनी वाहनांची दरवाढ 

Next

पुणे : राज्यातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गावरील टोलदरात वाढ झाली आहे. ३१ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून नव्या दराच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. पूर्वीच्या दराचा विचार करता १० ते ६५ रुपयांची दर वाढ झाली आहे. राष्ट्रीय प्राधिकरणाने देशातील सर्वच मार्गांवरील टोलचे दर वाढविले आहेत.

nकार, जीप, व्हॅनसाठी : कार, जीप, व्हॅन व सर्व प्रकारच्या खासगी चारचाकीसाठी एकेरी प्रवासासाठी ११० रुपये दर आकारण्यात आले. २४ तासांत परत येणाऱ्या वाहनासाठी १६५ दर असणार आहे. तर, ट्रकसाठी ३७० एकेरी, दुहेरीचे दर ५६० रुपये आहे.

व्यावसायिक वाहन :
nमिनी बस : एकेरी यात्रा १७५ रुपये, दुहेरी २६५, -
nचार ते सहा चाके असलेल्या वाहनांसाठी : एकेरी दर ५८५, तर दुहेरी ८७५ इतके दर ठरले आहे. एक महिन्यात ५० प्रवास करण्यासाठी १९ हजार ४३३ .
nसात पेक्षा जास्त चाके असणाऱ्या वाहनांसाठी : एकेरी ७१०, दुहेरी १०६५.

Web Title: Toll on ordinary people's pockets increased by 10%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.