खेड-शिवापूर टोलनाक्यावर टोलमुक्ती आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 05:32 AM2018-03-25T05:32:12+5:302018-03-25T05:32:12+5:30
भोर, वेल्ह्यातील नागरिकांना खेड शिवापूर येथील टोल माफ झालाच पाहिजे, याकरिता भोर वेल्हा काँग्रेसच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले. स्थानिकांना ओळखपत्राच्या आधारे त्यांच्याकडून टोल घेऊ नये. त्याकरिता त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, याकरिता हे आंदोलन करण्यात आले.
नसरापूर : भोर, वेल्ह्यातील नागरिकांना खेड शिवापूर येथील टोल माफ झालाच पाहिजे, याकरिता भोर वेल्हा काँग्रेसच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले. स्थानिकांना ओळखपत्राच्या आधारे त्यांच्याकडून टोल घेऊ नये. त्याकरिता त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, याकरिता हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी टोल प्रशासनाने टोलच्या वरिष्ठांशी चर्चा करून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊ, असे सुचवून निर्णय होईपर्यंत जसे चालू आहे तसे चालू राहील, असे सांगून हे आंदोलन थांबवावे, अशी विनंती केली. सकाळी ११ पासून सुरू असलेले आंदोलन सायंकाळी सव्वासात वाजेपर्यंत सुरू होते. या वेळी टोल प्रशासनाकडून टोलवरून टोल सुरक्षेच्या कारणास्तव थोड्या वाहनांना मोफत सोडण्यात येत होते. भोर, वेल्ह्यातील स्थानिकांच्या वाहनांना टोलवरून मोफत सोडावे, महामार्गाची अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावी, टोलनाक्यावर टोलवसुली करणाऱ्या कर्मचाºयांचे पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करावी.