पुणे जिल्ह्यात उभारणार टोमॅटो प्रोसेसिंग युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:11 AM2021-03-05T04:11:20+5:302021-03-05T04:11:20+5:30

सुषमा नेहरकर-शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कृषी उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला ...

Tomato processing unit to be set up in Pune district | पुणे जिल्ह्यात उभारणार टोमॅटो प्रोसेसिंग युनिट

पुणे जिल्ह्यात उभारणार टोमॅटो प्रोसेसिंग युनिट

Next

सुषमा नेहरकर-शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कृषी उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र शासन साहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र उत्पादनाची निवड केली. पुणे जिल्ह्यासाठी टोमॅटो पिकाची यात निवड केली आहे. लवकरच नारायणगाव व अन्य ठिकाणी टोमॅटो प्रोसेसिंग युनिट सुरू करणार आहेत. यासाठी शासनाकडून एका युनिटसाठी २७५ कोटींचे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.

कोरोनाकाळात ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले. यामुळेच केंद्र शासनाने ग्रामीण अर्थव्यवस्था व कृषी प्रधान अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शासनाने ‘एक जिल्हा एक उत्पादन’ निवड करून त्या उत्पादनाच्या दृष्टीने प्रक्रिया उद्योगांना चालना देणार आहे. या योजनेंतर्गत नाशवंत कृषीमाल, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाला पिके, मांस प्रक्रिया, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, किरकोळ वन उत्पादने आदी उत्पादनांचा समावेश आहे. यात पुणे जिल्ह्यासाठी कृषी विभागाकडून भाजीपाला आणि टोमॅटो केंद्र शासनाला पाठवले होते. केंद्र शासनाने यात टोमॅटोची निवड केली.

जिल्ह्यात ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीत राबविणार आहे. यात प्रकल्पांची उभारणी करताना केंद्र शासनाकडून ६० टक्के व राज्य शासनाकडून ४० टक्के अर्थसाहाय्य करणार आहे. तसेच यासाठीचे प्रशिक्षणाचा शंभर टक्के खर्च शासन करणार आहे.

---

नारायणगाव अन‌् पुरंदर येथे होणार टोमॅटो प्रोसेसिंग युनिट

जिल्ह्यात सर्वाधिक टोमॅटोचे उत्पादन जुन्नर तालुक्यात होत आहे. पहिले टोमॅटो प्रोसेसिंग युनिट नारयणगाव येथे उभारणार आहे. तसेच पुरंदर तालुक्यातून देखील यासाठी प्रस्ताव आला असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी दिली.

Web Title: Tomato processing unit to be set up in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.