टोमॅटोचे बाजारभाव कोसळले! दोन रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:49 PM2018-08-28T23:49:59+5:302018-08-28T23:50:42+5:30

Tomato sales fall! Two Rs per kg | टोमॅटोचे बाजारभाव कोसळले! दोन रुपये किलो

टोमॅटोचे बाजारभाव कोसळले! दोन रुपये किलो

Next

नारायणगाव : मेथी, कोथिंबीरला बाजारभाव नसल्याने शेतकरी त्रस्त असतानाच टोमॅटोचे बाजारभाव मंगळवारी (दि. २८) कोसळले. आवक कमी असतानाही मागणी नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात टोमॅटो क्रेटला ५० ते १५0 रु. असा बाजारभाव मिळाला. टोमॅटोला प्रतिकिलो २ रु. ५0 पैसे बाजारभाव असल्याने शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात टोमॅटोची विक्री केली तर काहींनी टोमॅटो फेकून दिली. टोमॅटो हंगाम सुरू झाल्यापासून पाच महिन्यांच्या कालावधीत निच्चांकी असा दर टोमॅटोला मिळाला आहे.

नारायणगावचे टोमॅटो मार्केट राज्यातील अग्रगण्य मार्केट म्हणून ओळखले जाते. टोमॅटो खरेदीसाठी परराज्यातून १०० ते १५० व्यापारी येतात. जून २0१८ पासून टोमॅटोचा हंगाम सुरू झाला, परंतु जून पासूनच सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळाला नाही. जून व जुलै मध्ये चांगल्या प्रतिच्या टोमॅटोला ३५0 ते ४00 रुपये प्रति क्रेट असा बाजारभाव मिळाला. त्यानंतर बाजारभाव घसरत गेला.
गेल्या वर्षी टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने अनेक शेतकरी मालामाल झाले. मात्र यावर्षी फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे टोमॅटो उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. नारायणगावचे टोमॅटो मार्केटमध्ये आज (दि.२८) रोजी १७ हजार ८७५ टोमॅटो क्रेटची आवक झाली.२0 किलोच्या क्रेटला ५0 रुपये पासून १५0 रुपयेपर्यंत बाजारभाव मिळाला. एप्रिलनंतर सर्वाधिक कमी दर आज मिळाला आहे.

मेथी, कोथंबीर, शेपू या भाजीपाल्यांचे बाजारभाव देखील स्थिर आहेत. कोथंबीर ५२ हजार ६00 जुडीची आवक झाली. त्यास शेकडा ३00 ते १00१ असा बाजारभाव मिळाला. मेथी ९६ हजार ३00 जुडीची आवक झाली. त्यास शेकडा ३00 ते १00१ असा बाजारभाव मिळाला. शेपू २५ हजार ९00 जुडीची आवक झाली. त्यास शेकडा ३0१ ते ५0१ असा बाजारभाव मिळाला. भाजीपाल्यांची एकूण १ लाख ७४ हजार ८00 जुड्यांची आवक नारायणगाव उपबाजार केंद्रात झाली, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. संजय काळे व संचालक अ‍ॅड. निवृत्ती काळे यांनी दिली.

३ लाख ४९ हजार १५0 क्रेटची आवक झाली. प्रति क्रेट ४0 ते १00 रुपये बाजारभाव मिळाला
८ लाख १ हजार ८१0 क्रेटची आवक झाली. प्रति क्रेट ५0 ते २५0 रुपये बाजारभाव मिळाला.
११ लाख२१ हजार ६३५ क्रेटची आवक
झाली. प्रति क्रेट १५0 ते २५0 रुपये बाजारभाव मिळाला.
१३ लाख ७९ हजार ६00 क्रेटची आवक
झाली. प्रति क्रेट २00 ते ४00 रुपये बाजारभाव मिळाला.
७ लाख ४३ हजार ६६५ क्रेटची आवक झाली. प्रति क्रेट १५0 ते २५0 रुपये बाजारभाव मिळाला.

Web Title: Tomato sales fall! Two Rs per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.