टोमॅटोचे बाजारभाव वाढले

By admin | Published: April 21, 2016 01:02 AM2016-04-21T01:02:23+5:302016-04-21T01:02:23+5:30

टोमॅटोच्या बाजारभावात वाढ झाली आहे. बुधवारी टोमॅटोचे एक क्रेट १५० ते २०० रुपयांना विकले गेले. बियाण्यात झालेली फसवणूक यामुळे टोमॅटोचे बाजारभाव वाढूनही शेतकऱ्यांना फारसा फायदा मिळत नाही.

Tomatoes have increased market prices | टोमॅटोचे बाजारभाव वाढले

टोमॅटोचे बाजारभाव वाढले

Next

मंचर : टोमॅटोच्या बाजारभावात वाढ झाली आहे. बुधवारी टोमॅटोचे एक क्रेट १५० ते २०० रुपयांना विकले गेले. बियाण्यात झालेली फसवणूक यामुळे टोमॅटोचे बाजारभाव वाढूनही शेतकऱ्यांना फारसा फायदा मिळत नाही.
लवकर (अगाद) लागवड झालेल्या टोमॅटोला सुरुवातीस कमी बाजारभाव मिळाला आहे. मागील महिनाभर टोमॅटोचे बाजारभाव ढासळलेले होते. एक क्रेट २० ते ५० रुपयांना विकला जात होता. टोमॅटो पिकासाठी मोठा भांडवली खर्च येतो. त्यामुळे या बाजारभावाने शेतकऱ्यांच्या अंगावर भांडवल आले होते. उन्हाळ्याच्या दिवसात टोमॅटोची विशेष काळजी घ्यावी लागते. मल्चिंग तसेच ठिबक सिंचन करावे लागते, त्यामुळे खर्चात वाढ होते.
मागील ८ दिवसांपासून टोमॅटोच्या बाजारभावात वाढ होऊ लागली आहे. टोमॅटोने क्रेटला १०० रुपये टप्पा पार केला.
बुधवारी टोमॅटोच्या एका क्रेटला १५० ते २०० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे. मालाची प्रतवारी पाहून भाव मिळतो.
> 150 ते 200 रुपयांना बुधवारी टोमॅटोचे एक क्रेट विकले गेले
20 ते 50
रुपयांना एक क्रेट विकला जात होता
उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते. मल्चिंग तसेच ठिबक सिंचन करावे लागते, त्यामुळे खर्च वाढतो.

Web Title: Tomatoes have increased market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.