‘टोमॅटो’ महाराजांनी गाशा गुंडाळला
By admin | Published: December 6, 2014 04:02 AM2014-12-06T04:02:54+5:302014-12-06T04:02:54+5:30
दौंड तालुक्यातील पिंपळगावच्या टोमॅटो महाराजाने अखेर आपला गाशा गुंडाळला असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. दरम्यान
खेड : दौंड तालुक्यातील पिंपळगावच्या टोमॅटो महाराजाने अखेर आपला गाशा गुंडाळला असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुणे येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने चौकशी सुरू
झाली आणि त्यातूनच नितीन महाराजाने गाशा गुंडाळला आहे
तर दुसरीकडे टोमॅटोच्या रसातून
ही भोंदुगिरी सुरू असताना अन्न व औषध प्रशासनाने वेळीच पायबंद का घातला नाही, असे प्रश्न विचारले जात आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून नितीन थोरात नावाचा महाराज भाविकांना प्रसाद म्हणून टोमॅटोचा रस देत असे. दरम्यान या रसाने ५५ रोग बरे होतात, अशी अफवा सोईनुसार पसरली गेल्याने या ठिकाणी महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, दिल्ली येथून पिंपळगाव परिसरातील फिरंगाईमातेच्या डोंगरावर टोमॅटोचा रस घेण्यासाठी येत असे. मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी साधारणत: दररोज ५ ते ७ लाख भाविक रस घेण्यासाठी येत असल्याने या परिसरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर गर्दी ओसरावी म्हणून आठवड्यातील काही दिवस टोमॅटोचा रसासाठी वाढविण्यात आले होते.
एकंदरीतच या ठिकाणी पैसे घेतले जात नसले तरी ऐच्छिक देणगी स्वीकारली जात होती. मात्र, फिरंगाईमातेच्या डोंगराच्या भोवती विविध दुकाने थाटली गेल्याने येथील अर्थकारण बदलले होतेच. मात्र, नितीनमहाराज थोरातांचे देखील अर्थकारण बदलले गेले असल्याचे परिसरात बोलले जात आहे.