उद्या तुम्ही कॉम्रेड प्रकाश म्हणजे प्रकाश आंबेडकर समजाल ; एल्गार परिषद प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 08:56 PM2019-01-31T20:56:23+5:302019-01-31T20:57:48+5:30
एल्गार परिषद आणि कोरेगाव भिमा प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कोणत्याही पत्रामध्ये डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा थेट उल्लेख नाही. तर पत्रांमध्ये केवळ कॉम्रेड आनंद असे नाव आहे. त्यामुळे कॉम्रेड आनंद म्हणजे डॉ. आनंद तेलतुंबडे नाही. उद्या तुम्ही कॉम्रेड प्रकाश म्हणजे प्रकाश आंबेडकर समजाल, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील रोहन नहार यांनी गुरुवारी केला.
पुणे : एल्गार परिषद आणि कोरेगाव भिमा प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कोणत्याही पत्रामध्ये डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा थेट उल्लेख नाही. तर पत्रांमध्ये केवळ कॉम्रेड आनंद असे नाव आहे. त्यामुळे कॉम्रेड आनंद म्हणजे डॉ. आनंद तेलतुंबडे नाही. उद्या तुम्ही कॉम्रेड प्रकाश म्हणजे प्रकाश आंबेडकर समजाल, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील रोहन नहार यांनी गुरुवारी केला.
डॉ. तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीनावर सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद झाला असून आज न्यायालय त्यावर निर्णय देणार आहे. विशेष सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. देशात अराजकता माजवण्यासाठी कोरेगाव भीमा दंगलीचा वापर करा, असा ठराव भारतीय कम्युनिस्ट पार्टीने केला होता. डॉ. तेलतुंबडे याने चळवळीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त माओवाद्यांना काही सूचना केल्या होत्या. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सर्व संशयित एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या ई-मेल संभाषणातून ते देश विरोधी कारवाईमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. मनोज कोण आहे. त्याच्याकडून किती कुरिअर पाठवण्यात आले आहे. त्यांना पैसे कुठून मिळाले. याचा तपास करण्यासाठी आनंद तेलतुंबडे यांच्याकडे चौकशी करण्याची आहे. त्यामुळे त्याचा अटकपुर्व जामीन फेटाळावा, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली.
अॅड. नहार यांनी हे अर्स आरोप फेटाळत सर्व पत्रांमध्ये संबंधित कॉम्र्रेड यांचे केवळ पहिले नाव देण्यात आले आहे. त्यामुळे उद्या पोलीस कॉम्रेड प्रकाश हे प्रकाश आंबेडकर आहेत, असे समजली, असा युक्तिवाद अॅड. नहार यांनी केला. त्यावर आम्ही कुठेही असे म्हंटले नसल्याचे अॅड. पवार यांनी स्षष्ट केले. अर्जावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला असून आज संध्याकाळी तो देण्यात येणार आहे.
इलेक्ट्रॉनिक पुरावे केले सादर
डॉ. तेलतुंबडे यांच्या विरोधात आज न्यायालयात इलेक्ट्रॉनिक पुरावे पोलिसांनी सादर केले. त्यामुळे केवळ पत्रात कॉम्रेड आनंद असा उल्लेख असणा-या डॉय आनंद तेलतुंबडे यांचे विरोधात ठोस पुरावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.